• Tue. Jul 14th, 2026

    गर्दीच्या वेळी ‘एसी लोकल’मधील एसी पडला बंद , १५ मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध

    गर्दीच्या वेळी ‘एसी लोकल’मधील एसी पडला बंद , १५ मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध

    Mulund AC Local Shutdown: टिटवाळा ते सीएसएमटी एसी लोकलमध्ये सकाळी एक धक्कादायक घटना घडली. मुलुंड रेल्वे स्थानकावर अचनाक वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने अनेक प्रवासी बेशुद्ध पडले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: सकाळी ऐन गर्दीच्या काळात मुंबईत एसी लोकलचा एसी बंद पडल्याने नागरिकांचा मोठा खोळंबा झाला. मुलुंडमध्ये एसी लोकलचा एसी अचानक १५ मिनिटांसाठी बंद झाला. अचानक लोकल बंद पडल्याने उकाडा वाढला आणि प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे काही प्रवासी गुदमरले. या घटनेनंतर ही एसी लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आली होती.

    टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये बिघाड

    मुलुंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २वर ही एसी लोकलचा एसी बंद पडली. सकाळी ८.३३ ची टिटवाळा ते सीएसएमटी एसी लोकल सकाळी साडे नऊच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानकावर दाखल होते. मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या दिशेला यावेळी प्रचंड गर्दी असते. या एसी लोकलमध्येही प्रवाशांची संख्या मोठी असते. मुलुंड रेल्वे स्थानकात अचानक ही लोकल १५ मिनिटांसाठी ठप्प होती. एसी लोकलचे दरवाजेही बंद होते. वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. एसी बंद पडल्याने अस्वस्थ होऊन तीन ते चार प्रवासी बेशुद्ध पडले. यानंतर ही एसी लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आली. सकाळी लोकलमधून विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने प्रवास करतात. या सर्व प्रवाशांचा खोळंबा झाला.

    या प्रवाशांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये स्थानकावर बंद पडलेली एसी लोकल दिसून येत आहे. एसी लोकलमध्ये प्रवासी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना लोकलमधून बाहेर काढण्यात आलं. या व्हिडिओमध्ये दोन महिला आणि एक पुरुष प्रवासी बेशुद्ध अवस्थेत दिसत आहेत. इतर प्रवाशांनी त्यांना रेल्वे स्थानकावर बाकड्यावर बसवून त्यांना पाणी दिलं. त्यांना वारं घालून पुन्हा शुद्धिवर आणण्याचा प्रयत्न सुरू केला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

    एसी लोकल दुरुस्तीसाठी पाठवणार

    अशा तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आता या बिघाड झालेल्या लोकलच्या इतर फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी सामान्य लोकलसेवा चालवली जाणार आहे. लोकलमध्ये काय बिघाड झाला आहे ते पाहून दुरुस्तीसाठी या एसी लोकलला कार्यशाळेत पाठवण्यात येईल. पण त्या लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

    Maharashtra TimesKonkan Railway: कोकणवासियांची ‘कन्फर्म’साठी आराधना सुरू, गणपतीसाठी आरक्षण खुले; रेल्वे आणि एसटीचं वेळापत्रक जाहीर

    मध्य रेल्वेवर सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे अशा गर्दीच्या काळात आरामदायी प्रवासासाठी प्रवासी एसी लोकलचा पर्याय निवडतात. एसी लोकलचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला की धोका वाढतो. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत. त्यासाठी अनेक साधारण लोकल गाड्या रद्द करण्यात येत आहेत. एसी लोकलचं भाडं सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नसल्यामुळे त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. एसी लोकलमुळे सामान्य लोकलचं वेळापत्रक खोळंबतं असा अनेकांचा आरोप आहे. तसेच, गर्दीच्या वेळी जर प्रवासी दरवाजाबाहेर लटकत असले तर दरवाजे बंद होत नाहीत. यामुळे हा पर्याय सुरक्षित मानला जातो. पण अशा घटनांमुळे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

    वाढत्या एसी लोकलमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खरचं फायदा होत आहे का? सर्व सामान्यांसाठी नॉन-एसी लोकल वाढवल्या पाहिजेत का ? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा