• Mon. Jul 13th, 2026
    मुसळधार कोसळल्यानंतर विश्रांती; देशभरात पावसाची १८% तूट, महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कधी बरसणार?

    Maharashtra Weather Update: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावासाचा जोर ओसरला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धो-धो कोसळल्यानंतर आता पुन्हा पावसाने दांडी मारली आहे. १३ जुलै रोजी संपूर्ण राज्यातील हवामान कसं असेल ?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात निर्माण झालेली ४०% तूट थेट १४ टक्क्यांवर आली होती. पण दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा दांडी मारली आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु या दरम्यान महाराष्ट्रात काय स्थिती असेल? १३ जुलै रोजी राज्यभरातील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया.

    महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरडं ऐन जुलै महिन्यात कोरडं वातावरण पाहायला मिळत आहे. रविवारपर्यंत बिहार, झारखंड, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या १५ जिल्ह्यांमध्ये १ जून ते १२ जुलैपर्यंत मोसमी पावसाची २० टक्के तूट नोंदली गेली. पुढील काही दिवसांत या ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज जरी वर्तवण्यात आला असला तरी ही दरी भरून काढण्यासाठी हा पाऊस पुरेसा नसेल. त्यात एल निनोचा परिणाम पुढील काही महिन्यात दिसून येणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील पिकांच्या पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्रात १३ जुलै रोजी, सोमवारी दिवसभर कोणत्या जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला नाही. काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

    मुंबई-पुणे परिसरातील हवामान कसं असेल?

    मुंबईसह उपनगरात आज दिवसभर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यांतही पावसाचा जोर कमीच राहील. पुण्यात घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. परंतु शहर परिसरात हलका पाऊस होईल. या शिवाय पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्येही तुरळक पावसाची नोंद होईल. तसेच, कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात कुठे-किती पाऊस होईल?

    सातारा जिल्ह्यात सोमवारी दिवसभर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पावसाची नोंद होऊ शकते. कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक पावसाची नोंद होईल. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज हवामान प्रामुख्याने कोरडं राहण्याची शक्यता आहे.

    उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील हवामान

    संपूर्ण नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आज हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार, आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडं राहण्याची शक्यता आहे.

    मराठवाड्यात हवामान कसं असेल?

    मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही आज दिवसभर तुरळक पावसाची नोंद होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये दिवसभर हवामान कोरडं राहील.

    Maharashtra TimesWeather Alert : 13 जुलैला 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार; IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत कोसळधारा?

    विदर्भात पावसाची शक्यता?

    १३ जुलैसाठी नागपूर, वर्धा,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. पण येत्या काही दिवसातं, म्हणजेच, १४ ते १५ जुलैपर्यंत विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची नोंद होईल.

    तुमच्या जिल्ह्यांत हवामान कसं आहे? जुलै महिन्यात पावसाचा जोर पुन्हा वाढेल का? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा