• Mon. Jul 13th, 2026

    Tukaram Mundhe Pune: पुण्यातील शुक्रवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई; आयुर्वेदिक दुकानावरील धाडीत घबाड हाती, ५० लाखांचा साठा जप्त!

    Tukaram Mundhe Pune: पुण्यातील शुक्रवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई; आयुर्वेदिक दुकानावरील धाडीत घबाड हाती, ५० लाखांचा साठा जप्त!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: दूध भेसळ आणि हॉटेलांवरील कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता औषधविक्रीची तपासणीही सुरू केली आहे. शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर टाकलेल्या धाडीत विनापरवाना ठेवलेले पन्नास लाख छत्तीस हजार रुपयांचा संशयित भस्म व रस औषधसाठा जप्त करण्यात आला.

    विनापरवाना भस्म व रस औषधांची विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शुक्रवार पेठेतील ‘कल्पतरू आयुर्वेद’ या दुकानावर ‘एफडीए’च्या औषध निरीक्षकांनी छापा टाकून भस्म आणि रस औषधांचा साठा जप्त केला.

    तपासणीदरम्यान प्लास्टिकच्या पिशव्या, बरण्या आणि बाटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भस्म व रस औषधे साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. मात्र, या औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, मुदत संपण्याची तारीख, उत्पादकाचे नाव व पत्ता; तसेच परवाना क्रमांक अशी आवश्यक माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती. दुकान चालकाकडे यांच्या या औषधांच्या खरेदीची बिल किंवा मालकी दर्शविणारी कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे हा संपूर्ण साठा संशयित मानून जप्त करण्यात आला.

    सोलापूरला मेडिकल बंद

    सोलापूर येथे रुग्णांना हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार ‘एफडीए’कडे करण्यात आली होती. त्यानंतर नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या फातिमा मेडिकलची तपासणी करण्यात आली. तपासणीत रुग्णांना औषधांचे प्रीस्क्रिप्शन दिले जात नसल्याचे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ‘शेड्यूल एच’ आणि ‘एच-१’मधील औषधांची विक्री होत असल्याचे आढळले.

    दरम्यान, सोलापुरात केलेल्या कारवाईत औषध विक्रीची बिल ठेवण्यात आले नव्हते. थंड वातावरणात ठेवावयाची औषधे बाहेरील रॅकवर ठेवण्यात आली होती. मुदतबाह्य औषधे स्वतंत्रपणे ठेवली नव्हती; तसेच औषधांच्या खरेदी आणि विक्रीच्या नोंदीत तफावत आढळली. त्यामुळे संबंधित मेडिकल स्टोअरला ‘स्टॉप ॲक्टिव्हिटी’ आदेश देऊन व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed