Ramdas Athawale On Sharad Pawar: आपण पवार यांच्याबरोबर होतो, तेव्हा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला होता. तो त्यांनी मानला असता; तर कदाचित ते देशाचे पंतप्रधान झाले असते, असा दावाही आठवले यांनी या वेळी केला.
‘पवार यांचा पक्ष अजूनही ‘एनडीए’मध्ये समाविष्ट होऊ शकतो. त्यातच समाजाचे आणि देशाचे हित आहे,’ अशा शब्दांत आठवले यांनी पुन्हा शरद पवार यांना सल्ला देऊन ‘एनएडीए’चे आमंत्रण दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे विलीनीकरण झाले असते; तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाध्यक्ष झाले असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे,’ असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
Moshi Accident: 83 तासांत मोशीतील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 8 जणांचा करुण अंत; घटनास्थळी कुटुंबाचा हंबरडा
एका कार्यक्रमानिमित्ताने आठवले पुण्यात आले असता त्यांनी त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी ‘आरपीआय’चे शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिपाल वाघमारे, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप आदी उपस्थित होते.
‘‘ऑपरेशन टायगर’ हे भाजप अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलेले नाही; तर ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते असून, त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली नसती; तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती,’ अशा शब्दांत आठवले यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
Sushma Andhare |मोशी दुर्घटना प्रकरणी पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
‘शिंदे मुख्यमंत्रिपदी नाहीच’
केंद्रात फडणवीस यांना मंत्री केल्यास राज्यात शिंदे यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे आमदार बच्चू कडू म्हणाले होते. त्याबाबत विचारता, ‘सन २०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी राहतील. भाजप शिंदे यांना यापुढे मुख्यमंत्री होऊ देणार नाही,’ अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली.
मातृभाषेचा अभिमान बाळगणे अत्यावश्यकच आहे. मात्र, त्या अभिमानातून अन्य भाषांचा द्वेष करणे हा संविधानाचा अपमान आहे. मुंबईमध्ये ६० टक्के मराठी; तर ४० टक्के अन्य भाषिक लोक राहतात. त्यामुळे देशात बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेत भाषण करणे अजिबात गैर नाही. -रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
