• Mon. Jul 13th, 2026
    दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या; उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र

    Mumbai News : उपमहापौर संजय घाडी यांना दहिसरहून मुंबई शहर गाठताना लागणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मानसिक, शारीरिक त्रास होऊ लागल्याचे अश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रोजच्या नोकरी-व्यवसायासाठी रस्तेप्रवास करताना नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीच्या यातनांच्या कळा उपमहापौरांनाही असह्य झाल्या आहेत. मुंबई महापालिकेतील विविध बैठकांची वेळ गाठताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतील शहर भागातच निवासस्थान मिळावे, यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे. राणी बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    वाहतूक कोंडीचा मानसिक-शारीरिक त्रास

    खोपोली-कसाऱ्यापासून ते डहाणूपासून मुंबईत कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी दररोज प्रसंगी जीव धोक्यातही घालणाऱ्या मुंबईकरांच्या व्यथेवर वर्षानुवर्षे साधी फुंकरही घातली गेलेली नाही. अशातच उपमहापौरांनाही या वाहतूक कोंडीमुळे मानसिक, शारीरिक त्रास होऊ लागल्याचे घाडी यांनी या पत्रात म्हटले आहे.
    Maharashtra TimesSavariya Basant : 21 वर्षीय मेडिकल विद्यार्थिनीचा जीव घेतला, वादावादीत वर्गमित्राचं कृत्य, कुटुंबाचे गंभीर आरोप; जखम नसलेला शरीराचा एकही भाग उरला नाही

    वाहतूक कोंडीत वेळ जातो वाया

    ‘दैनंदिन कामासाठी महापालिका मुख्यालयातील बैठका, महापालिका सभा, उपमहापौर कार्यालयात येणारे नागरिक, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी व प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक असते. परंतु आपण दहिसर पूर्वेला वास्तव्यास असल्याने दहिसर येथून मुंबई महापालिका मुख्यालय येथे वाहनाने दररोज ये-जा करण्यात वाहतूक कोंडीमुळे माझा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे महापालिका मुख्यालयात वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीमुळे रिक्त झालेला राणी बाग परिसरातील बंगला हा निवासस्थानाकरिता उपलब्ध व्हावा’, असे घाडी यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Tamil nadu CM C. Joseph Vijay यांनी 2 महिन्यात घडवला बदल, Thalapathy Vijay pattern ची देशात चर्चा

    मुंबई महापालिकेतील महापौरांचा बंगला हा भायखळ्यातील राणीच्या बागेत आहे. या बंगल्याच्या शेजारीच महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा सेवानिवासस्थान असलेला बंगला आहे. याच बंगल्यासाठी उपमहापौर संजय घाडी प्रयत्नशील आहेत.

    अधिकार महापालिका आयुक्तांना

    अश्विनी जोशी यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे रुजू झाल्या आहेत. सध्या लवंगारे यांचे वास्तव्य मलबार हिल येथील केंद्र सरकारच्या निवासस्थानी आहे. हे निवासस्थान त्यांना सोडावे लागणार आहे. बॉम्बे रुग्णालयाच्या मागे आयएएस अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून निवासस्थाने उपलब्ध करण्यात आली असून, तेथे अतिरिक्त आयुक्त लवंगारे यांना निवासस्थान मिळू शकते.
    Maharashtra TimesCrime News : स्वित्झर्लंड फिरायला गेलेलं भारतीय दाम्पत्य एकाएकी बेपत्ता, मुलीची पोलिसात धाव, 60 जणांशी कनेक्शन समोर
    मात्र, त्यांनी भायखळातील अतिरिक्त आयुक्तांसाठीच्या बंगल्याबाबत अर्ज केल्यास त्यांनाही तो मिळू शकतो. याच बंगल्यासाठी आणखी एक अतिरिक्त आयुक्तही प्रयत्नशील आहेत. मात्र यावर निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांनाच आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा