म. टा. प्रतिनिधी, पुणे: लोणावळा-कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. मार्गावरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने तिन्ही मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन करता यावे यासाठी मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान पुणे-मुंबई मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या २२ नियमित आणि आठ विशेष गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
दरड हटवून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. ११००हून अधिक कामगारांच्या अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. सध्या एक मार्गिका सुरू झाली असली, तरी तिन्ही मार्गिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून आता १७ जुलैपर्यंत या मार्गावरील नियमित धावणाऱ्या व विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
कोणत्या गाड्या सुरू?
घाटातील एक लाइन सुरू करण्यात यश आले आहे. त्यावरून काही गाड्या सुरू आहेत. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी प्रगती, इंटरसिटी, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस या गाड्या सुरू राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना यामधून प्रवास करता येणार आहे. हीच प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
कोणत्या रद्द?
दररोज धावणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये हुबळी-दादर एक्स्प्रेस, इंदूर-दौंड एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस; तसेच सीएसएमटी-चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या १० ते १७ जुलै या कालावधीत दोन्ही दिशांनी पूर्णपणे रद्द राहणार आहेत. याशिवाय महालक्ष्मी एक्स्प्रेस, जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, सातारा-दादर एक्स्प्रेस आणि दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस या गाड्याही ठरावीक तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-गोरखपूर, पुणे-गोरखपूर, पुणे-गाझीपूर सिटी आणि पुणे-हजरत निजामुद्दीन या विशेष गाड्यांच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती मोबाइल ॲप, रेल्वे हेल्पलाइन किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर तपासण्याचे आवाहन केले आहे.
सर्वाधिक काळ परिणाम
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील बोरघाट हा सह्याद्रीतील अतिशय संवेदनशील आणि आव्हानात्मक रेल्वे विभाग मानला जातो. मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे आणि रुळांखालील खडी वाहून जाणे यांमुळे या मार्गावरील रेल्वे सेवा अनेकदा ठप्प झाली आहे. त्यामध्ये ऑगस्ट २०१९मधील घटना सर्वाधिक गंभीर ठरली. कर्जत-लोणावळा दरम्यान मंकी हिल आणि ठाकूरवाडी परिसरात भीषण दरडी कोसळल्याने सलग १३ दिवस मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. या काळात ४००हून अधिक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सर्वाधिक दिवस रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्या अगोदर २६ जुलै २००५च्या महापुरामुळेही मुंबई-पुणे रेल्वे संपर्क अनेक दिवस खंडित झाला होता. जुलै २०१९मध्ये खंडाळा घाटात रुळांवर मोठे दगड कोसळल्याने डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेससह महत्त्वाच्या गाड्या तीन ते चार दिवस रद्द करण्यात आल्या होत्या. जुलै २०२१मध्ये अतिवृष्टीमुळे रुळांखालील खडी वाहून गेल्याने अनेक दिवस वाहतूक विस्कळित राहिली आणि अनेक गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. यामुळे बोरघाटातील अतिवृष्टी हा मध्य रेल्वेसमोरील सातत्याने निर्माण होणारा मोठा आव्हानात्मक विषय ठरला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा