Nanded Crime News : शांत आणि संयमी शिक्षक म्हणून ओळख असलेल्या एन. टी. जाधव यांच्या मृत्यूने नांदेड हादरलं आहे. घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून अनेक चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एन टी जाधव हे शिक्षक असून हिमायत शहरात खाजगी शिकवणी केंद्र चालवतात. अनेक वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. शांत आणि संयमी अशी त्यांची ओळख आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविले होते. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना ट्युशन परिसरातील चिंचेच्या झाडाला जाधव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती तात्काळ हिमायतनगर पोलीसांना दिली.
Tukaram Mundhe FDA Action : 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक, माजी विद्यार्थी, पालक आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, या आत्महत्ये मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी भूखंड व्यवहाराशी संबंधित वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या शाळेची मान्यता रद्द झाल्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या सर्व बाबींना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
Chhatrapati Sambhajinagar Crime : तरुणीच्या लग्नाला अवघे काही दिवस, नवऱ्याला अचानक एक फोन, पुढे समोर आलं धक्कादायक प्रकरण
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचे खरे कारण शोधण्यासाठी सर्व शक्य त्या अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येनंतर विविध चर्चाना उधान आल आहे हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
