• Fri. Jul 10th, 2026
    Ashadhi Ekadashi Schedule : ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत, माऊली यंदाच्या पालखींचं वेळापत्रक पाहिलं का? वाचा सविस्तर

    Ashadhi Ekadashi 2026 Palkhi Schedule : वारकरी संप्रदायांसाठी पंढरीची वारी अतिशय महत्वाची मानली जाते. यावर्षी देखील भक्त ताळ-मृदंग घेऊन विठ्ठलाच्या नामाचा जयोघोष करत वारीत सहभागी झाले आहेत.

    पंढरपूर वारी वेळापत्रक 2026(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह गुरुवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाल्या अन् पुण्यनगरीत अनुपम्य सुखसोहळ्याला सुरुवात झाली. संतांच्या पालख्यांनी अवघे शहर अनामिक ऊर्जा आणि चैतन्याने भारावून गेले. ‘संतभार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत’, या संत जनाबाईंच्या अभंगाप्रमाणे उद्या, शनिवारपर्यंत पुण्यनगरी कीर्तनाचा गजराने दुमदुमणार आहे.

    ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’

    खांद्यावर भागवत धर्माची पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात टाळ अन् मृदंग आणि मुखात ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ असा अखंड जयघोष करीत हजारो अबालवृद्ध वारकऱ्यांचा मेळा गुरुवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी पुष्पवृष्टीने स्वागत केले. टाळ मृदंगाच्या गजरात पालखी मार्ग विठ्ठलमय झाला होता. वाकडेवाडी येथील मुळा आणि मुठा नदीच्या संगमाच्या तीरावर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीने ‘अवघा रंग एक झाला’! विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळा अलंकापुरी आणि देहूतून पंढरीच्या दिशेने निघाला आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक वारकऱ्यांना देहू-आळंदी गाठता आले नाही. त्यामुळे माऊलींच्या भेटीचा योग पुण्यनगरीत आला.
    Maharashtra TimesSindhudurg News: आजारी आईचा मृत्यू; ११ वर्षीय तन्वीने धैर्य दाखवलं, माऊलीला दिला मुखाग्नी, प्रसंग पाहून सगळेच गलबलले!

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन

    हजारो वारकऱ्यांनी देहू-आळंदीच्या पुढे पालख्यांमध्ये सहभागी होत वारीला सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी वाकडेवाडी येथे दाखल झाली. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी संगम पुलाजवळ पाटील इस्टेट येथे पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही पालख्या फुलांच्या आकर्षक रचना आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्या होत्या. पालख्या चौकात येताच ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा गजर करीत भाविक या सुखसोहळ्याचे साक्षीदार ठरले. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी औक्षण करून स्वागत केले.

    उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, आयुक्त नवलकिशोर राम यांनी पालख्यांचे दर्शन घेतले. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, शिवाजीनगर पोलिस मुख्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, डेक्कन जिमखाना, टि‌ळक चौक, लक्ष्मी रस्ता येथे दोन्ही पालख्यांवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. ठिकठिकाणी पादुकांच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी गेल्याने पालखी मार्ग वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला होता. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आणि संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे आरती झाल्यावर दोन्ही पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या. निवडुंगा विठोबा मंदिरात तुकाराम महाराजांची पालखी आणि पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने विसावा घेतला. दोन्ही पालख्या शनिवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.
    Maharashtra TimesSupriya Sule : पवार-शिंदे भेट ते भाजपसोबतची युती; राजकीय वर्तुळात चर्चांनी काहूर, सुप्रिया सुळेंचं फायनल उत्तर!

    जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी (देहू)

    देहू मुख्य मंदिरातून भजन-कीर्तनाच्या गजरात प्रस्थान

    रिंगण : गोल रिंगण सोहळ्यासाठी इंदापूरचं मैदान सज्ज

    सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये महत्त्वाचा विसावा

    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम आणि रिंगण सोहळा

    पालखी 8 जुलै 2026 बुधवार रोजी दुपारी 3 वाजता आळंदीहून प्रस्थान करेल आणि 24 जुलै 2026 रोजी पंढरपूरला पोहोचेल. यात सुमारे 17 दिवस पायी प्रवास, 4 गोल रिंगण आणि 3 उभे रिंगण होणार आहे.
    Maharashtra TimesNanded News : ट्रॅव्हलिंग बिझनेसच्या नावाखाली भलताच धंदा, पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री, तुकाराम मुंढेंचा आदेश; एका रात्रीत खेळ खल्लास

    प्रमुख मुक्काम

    8 जुलै : आळंदी प्रस्थान + मुक्काम
    9-10 जुलै : पुणे 2 दिवस मुक्काम
    11-12 जुलै : सासवड 2 दिवस
    13 जुलै : जेजुरी
    14 जुलै : वाल्हे
    15 जुलै : लोणंदमध्ये नीरा स्नान
    16 जुलै : तरडगाव
    17 जुलै : फलटण
    18 जुलै : बरड
    19 जुलै : नातेपुते
    20 जुलै : माळशिरस
    21 जुलै : वेळापूर
    22 जुलै : भंडीशेगाव (बंधूभेट)
    23 जुलै : वाखरी
    24 जुलै : पंढरपूर (आगमन)

    रिंगण सोहळ्यांचे वेळापत्रक

    पहिले उभे रिंगण – 16 जुलै 2026 (चांदोबाचा लिंब, तरडगाव जवळ)
    पहिले गोल रिंगण – 20 जुलै 2026 (पुरंदवडे, माळशिरस)
    दुसरे गोल रिंगण – 21 जुलै 2026 (खुडूस/खडूस फाटा, वेळापूर)
    तिसरे गोल रिंगण – 22 जुलै 2026 (ठाकुरबुवाची समाधी, भंडीशेगाव)
    दुसरे उभे रिंगण – 23 जुलै 2026 (बाजीरावची विहीर, वाखरी)
    तिसरे उभे रिंगण – 24 जुलै 2026 (इसबावी/पंढरपूर प्रवेशादरम्यान, दुपारी)
    Maharashtra TimesNandigram Express Honeymoon : हनिमूनसाठी रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये अनधिकृत सजावट, घटनेनंतर रेल्वेचं कठोर पाऊल; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं?
    25 ते 28 जुलै : पंढरपुरात मुक्काम-आषाढी एकादशी सोहळा 25 जुलै-नंतर परतीचा प्रवास

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा