Amravati Hospital NICU Fire :जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासकीय दिरंगाईची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इमारत अवघ्या एक-दोन वर्षांपूर्वीची आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कशी कोलमडली
इमारत अवघ्या एक-दोन वर्षांपूर्वीची आणि अद्ययावत असतानाही आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कशी कोलमडली, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पहाटे व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी रुग्णालयातील ‘फायर अलार्म’ वाजलाच नाही. एवढेच नव्हे, तर आगीचा धूर पसरल्यानंतर आपोआप सुरू होणारे ‘फायर फॉगर’ही कार्यान्वित झाले नाहीत.
प्रशासकीय दिरंगाईची धक्कादायक माहिती समोर
जिल्हा स्त्रीरुग्णालयातील (डफरिन) नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासकीय दिरंगाईची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयाचे ‘ फायर ऑडिट ’ करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने तब्बल ३७ दिवस या अत्यंत संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.
‘मटा’ने दुर्घटनेतील तांत्रिक त्रुटी , प्रशासकीय हलगर्जीपणावर प्रकाश टाकला
‘मटा’ने या दुर्घटनेतील तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय हलगर्जीपणावर प्रकाश टाकला होता. आता समोर आलेल्या नव्या माहितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी २५ जून रोजीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला रुग्णालयाचे फायर ऑडिट तातडीने पूर्ण करण्यासाठी अधिकृत पत्र दिले होते. मात्र, तीन आठवडे उलटूनही कोणतीही हालचाल न झाल्याने डॉ. पवार यांनी १७ जुलै रोजी पुन्हा स्मरणपत्र पाठवले.
Ghatkopar Development Works:कामे अपूर्ण तरी कंत्राटदारांना निधी ?२८ पैकी २४ कामांना सुरुवातही नाही; घाटकोपरमधील प्रकार
प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी किंवा सुरक्षा तपासणी करण्याचे सौजन्य दाखवले नाही
डॉ. पवार यांनी कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांशी वैयक्तिक संपर्क साधला असता, ‘प्रक्रिया सुरू असून लवकरच एजन्सी नियुक्त केली जाईल’, अशीच उत्तरे देण्यात आली. तब्बल ३७ दिवस उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी किंवा सुरक्षा तपासणी करण्याचे सौजन्य दाखवले नाही.
Nashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’
व्हेंटिलेटरही तपासाच्या रडारवर
दुसरीकडे, आगीच्या घटनेशी संबंधित असल्याचा संशय असलेले व्हेंटिलेटरहीतपासाच्या रडारवर आले आहे. नागपूर येथील एका कंपनीकडून अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले होते. अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. जी. राऊत यांनी सोमवारी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या उपकरणांबाबत शंका उपस्थित केली होती. या उपकरणांचा दर्जा आणि खरेदी प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
