• Wed. Aug 26th, 2026

रायगड जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंद – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 9, 2026
रायगड जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंद – महासंवाद


मुंबई, दि. ९ जुलै : राज्यात मान्सून सक्रिय असून यंदाच्या पावसाळ्यात १ जून पासून राज्यात सरासरी ३३२ मिमी पाऊस  झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंत दिलेल्या प्राप्त माहितीनुसार मागील २४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पाऊस झाला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये  पावसाची नोंद झाली आहे.

त्याखालोखाल ठाणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३७.२ मिमी, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ३२.४ मिमी, रत्नागिरीमध्ये ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या या समाधानकारक पावसामुळे मान्सूनची सक्रियता कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed