• Wed. Aug 26th, 2026

Ghatkopar Development Works:कामे अपूर्ण तरी कंत्राटदारांना निधी ?२८ पैकी २४ कामांना सुरुवातही नाही; घाटकोपरमधील प्रकार

Ghatkopar Development Works:घाटकोपर येथील विकासकामांबाबत एक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या ‘एन’वॉर्डमधील अनेक कामे प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसतानाही ती पूर्ण झाल्याचे दाखवून कंत्राटदारांच्या निधीसाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला.कागदावर २८ कामे पूर्ण ;मात्र स्थायी पाहणीत तफावत उघड झाली. त्यामुळे हा प्रस्तास वादळी ठरण्याची शक्यता आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी,मुंबई:मुंबई महापालिकेच्या ‘एन’ वॉर्डमधील घाटकोपर येथील विकासकामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक कामे प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसतानाही ती पूर्ण झाल्याचे दाखवून संबंधित कंत्राटदारांना निधी देण्याचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर येणार असल्याची माहिती आहे. स्थायी समिती सदस्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत या विकासकामांच्या कागदावरील नोंदी आणि प्रत्यक्ष स्थितीत मोठी तफावत आढळली आहे. त्यामुळे या प्रस्तावांवर स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

२० ऑगस्ट २०२६ रोजी पाहणी केली

‘एन’ वॉर्डमधील विकासकामांची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासह सात सदस्यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी पाहणी केली. महापालिका अधिनियमातील कलम ६९-सी अंतर्गत पाच लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण २८ कामांची पाहणी होणार होती.

कामे प्रत्यक्षात नाहीच

मात्र, सुरुवातीच्या ठिकाणांची पाहणी करताच, अनेक कामे प्रत्यक्षात झालेली नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले. या पाहणीत २८पैकी केवळ एक काम पूर्ण, तीन कामे सुरू, तर तब्बल २४ कामे अद्याप सुरूच झाली नसल्याचे आढळले. त्यानंतर शिंदे यांनी सर्व कामांचा सविस्तर अहवालतयार करून तो स्थायी समितीसमोर सादर करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थायी समितीसमोर येणाऱ्या प्रस्तावांमध्ये संबंधित कामांची स्थिती आणि पूर्णत्वाची माहिती दिली जाते. मात्र, घाटकोपरमधील पाहणीत अनेक कामे सुरूही झाली नसल्याचे समोर आल्याने नोंदी आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केवळ रंगरंगोटी झाल्याचे दिसले

पाहणीतील बहुतांश कामांची किंमत २५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. विक्रोळी पार्कसाइट येथील जुन्या अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत काम फारसे झालेले दिसून आले नाही, केवळ रंगरंगोटी झाल्याचे दिसले, असे एका समिती सदस्याने सांगितले. त्यामुळे काम खरोखर पूर्ण झाले का, याबाबत संशय व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesOnion Price: कांदाभावात अंशतः दिलासा? केंद्राकडून पुरवठ्यानंतर दरात घट होण्याचे संकेत

गटारदुरुस्तीचे काम अद्याप सुरूच झालेले नाही

स्थायी समितीने घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचीही पाहणी केली. तेथे काम सुरू असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे काम सुमारे महिनाभरापूर्वी सुरू झाले आहे. त्यानंतर एस. जी. बर्वे नगर डी चाळ महापालिका वसाहतीतील गटारदुरुस्तीच्या कामाची पाहणी केली असता ते काम अद्याप सुरूच झालेले नसल्याचे समोर आले.

Maharashtra TimesMumbai News : लोखंडी सळई उडून डोक्यावर आदळली, विद्याविहारमध्ये विद्यार्थी जखमी, डोक्याला टाके, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप

अहवालावरून महापालिका प्रशासनाला जाब विचारला जाऊ शकतो

पाहणीनंतर सविस्तर अहवालाचा अभ्यास करून स्थायी समिती या प्रकरणावर योग्य निर्णय घेईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या आठवड्यातील स्थायी समिती बैठकीत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. कामांची प्रत्यक्ष स्थिती, कंत्राटदारांना प्रस्तावित देयके आणि दक्षता विभागाच्या अहवालावरून महापालिका प्रशासनाला जाब विचारला जाऊ शकतो. त्यावर प्रशासन काय उत्तर देते, ते कळेल.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा