Mumbai TV Serial Junior Artist Death : मुंबईतील साकीनाका येथील एसजे स्टुडिओमध्ये चित्रीकरण ‘आरंभी’ या टीव्ही मालिकेचं शूट संपवून ५१ वर्षीय ज्युनियर आर्टिस्ट संजीब सिंग घरी चालले होते
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टीव्ही मालिकेच्या चित्रीकरणानंतर घरी परतत असताना ५१ वर्षीय ज्युनियर आर्टिस्ट संजीब सिंग यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ने यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी पहाटे शूट संपवून घरी जाताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
सेटवरुन जाताना हार्ट अटॅक
या घटनेबाबत बोलताना एफडब्ल्यूआयसीईचे सरचिटणीस अशोक दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीब सिंग हे ‘आरंभी’ या टीव्ही मालिकेत काम करत होते, मुंबईतील साकीनाका येथील एसजे स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरु होते. त्यांची शिफ्ट दुपारी २ वाजता सुरु झाली आणि चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ती संपली.
पेट्रोल पंपावरच कोसळले
चित्रीकरणादरम्यान संजीब सिंग यांना अस्वस्थ वाटत होते आणि त्यांनी विश्रांतीसाठी काही काळ ब्रेकही घेतला होता. चित्रीकरण संपल्यानंतर ते बाईकने घरी निघाले. वाटेत पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी बाईक एका पेट्रोल पंपावर थांबली असता, तिथेच ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय आहे. Moushumi Chatterjee : अभिनेत्री मौशमी चॅटर्जींना दणका, नाशिकच्या निवृत्त डॉक्टरला मानसिक त्रासाची भरपाई द्या, ग्राहक आयोगाचे आदेश
पार्थिव कोलकात्याला पाठवलं
अविवाहित असलेल्या संजीब सिंग यांच्या पश्चात कोलकाता येथे बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. अशोक दुबे यांच्या माहितीनुसार, त्यांची बहीण घटस्फोटित आहे, तर भाऊ गंभीर आजारी आहे. कूपर रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी हवाई मार्गाने कोलकाता येथे पाठवले. त्यापूर्वी (FWICE) ने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.
दुबे यांनी सांगितले की, त्यांनी या कार्यक्रमाचे निर्माते ‘मल्हार क्रिएशन्स’च्या प्रतिनिधींशी चर्चा करुन त्यांना मृत ज्युनिअर आर्टिस्टच्या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. कामाशी संबंधित प्रवासादरम्यान कामगारांची काळजी घेण्याची जबाबदारी निर्मिती संस्थांची असते, या मुद्द्यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. तसेच ज्युनियर कलाकारांचा पुरवठा करणारे रवींद्र सुरी यांनी फेडरेशनला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
VIDEO | शिक्षकांच्या मागण्यांसाठी रोहित पवार आझाद मैदानात
कामगारांच्या आरोग्याची चिंता
या घटनेमुळे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील दीर्घकाळ आणि कष्टाचे काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याबाबतच्या चिंता पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. ‘एफडब्ल्यूआयसीई’ गेल्या सहा आठवड्यांपासून ‘सोनी’ आणि ‘डॉक्टर फॉर यू’ या स्वयंसेवी संस्थेच्या भागीदारीत चित्रीकरणाच्या सेटवर आरोग्य तपासणीचे उपक्रम राबवत आहेत. कामगारांच्या रक्तदाबाची तपासणी करणे तसेच त्यांना प्राथमिक औषधे व वैद्यकीय सल्ला देणे यासाठी विविध चित्रीकरण स्थळांवर दररोज तीन रुग्णवाहिका तैनात केल्या जातात. Crime News : वडिलांच्या निधनानंतर आईला सरकारी नोकरी, 23 वर्षांची मुलगी नाराज; स्कॉर्पिओ अंगावर घालून जीव घेतला
लोकप्रिय आरंभी मालिका
‘आरंभी’ ही कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय हिंदी मालिका आहे. या मालिकेची निर्मिती ‘मल्हार कंटेंट क्रिएशन्स’च्या बॅनरखाली मुक्ता धोंड यांनी केली आहे. यात डॉ. आरंभीच्या भूमिकेत ऐश्वर्या खरे, आहे तर अरिजित तनेजा (ध्रुव चावला) आणि आदित्य रेडीज (डॉ. विश्वास टंडन) यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही कथा डॉक्टर आणि आईच्या संघर्षावर व आयुष्यातील आव्हानांवर आधारित आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा