• Wed. Jul 8th, 2026

    Satara News : अनेक कुटुंबांचे स्थलांतर, ‘मिनी काश्मीर’च्या पावसाळी पर्यटनाला अतिवृष्टीचा फटका; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

    Satara News : अनेक कुटुंबांचे स्थलांतर, ‘मिनी काश्मीर’च्या पावसाळी पर्यटनाला अतिवृष्टीचा फटका; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

    सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यात मुसळधार पावसाचा प्रकोप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच अद्यापही दरडी कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यातील घाटमाथा आणि डोंगराळ भागातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत. तसेच भूस्खलन होऊन रस्ते खचले आहेत. अशा धोकादायक पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यातील महत्वाच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोयना आणि कृष्णा नदीला पूर आल्याने छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.

    धोकादायक रस्त्यांची वाहतूक बंद

    सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगर उतारावरील माती सैल झाल्यामुळे दरडी कोसळत आहेत. काही ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते खचले आहेत. महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील धोकादायक बनलेल्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.

    हे मार्ग वळवले

    रस्ता खचल्याने सातारा-कास-बामणोली-तापोळा-महाबळेश्वर मार्ग तात्पूर्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुक मांगर-पारूट ते झोळाची खिंड मार्गे वाळविण्यात आली आहे.
    Maharashtra TimesRaigad Flood : पाताळगंगा नदीत 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेले, धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे आदेश
    पाटण तालुक्यातील डिचोली-नवजा-हेळवाक हा रस्ता देखील खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोयना नेहरू उद्यान ते कामरगाव मार्गाने वळविण्यात आली आहे. प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे.

    घाटमाथ्यावर गंभीर परिस्थिती

    घाटमाथा आणि डोंगराळ भागात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले असून दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नद्या, ओढे आणि धरणांतील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
    Maharashtra TimesNashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा प्रकोप; रस्ते खचले, वाहने अडकली, नद्यांना पूर

    दरड कोसळण्याचे आणि रस्ते खचण्याचे सत्र सुरुच

    महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात पावसामुळे दरडी कोसळण्याचे आणि रस्ते खचण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्याचबरोबर कोयना आणि उपनद्यांना पूर आल्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

    धरण क्षेत्रात पावसाचा जोर

    मोरणा-गुरेघर, कण्हेर, वीर, तारळी धरणासह सह लघु पाटबंधारे प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात प्रति सेकंद ७९,७०८ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ लक्षणीय होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा