• Wed. Jul 8th, 2026

    Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा प्रकोप; रस्ते खचले, वाहने अडकली, नद्यांना पूर

    Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा प्रकोप; रस्ते खचले, वाहने अडकली, नद्यांना पूर

    नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा प्रकोप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील रस्ते खचल्याचं बघायला मिळालं. मुसाळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काल आणि आज पहाटे पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. ७ जुलै सकाळी साडे आठ ते ८ जुलै रोजी सकाळी साडे आठ पर्यंत तब्बल २७० मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शहरातील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.

    शहरातील प्रमुख नदी गोदावरी आणि नंदिनी नदी यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीला पुराचे पाणी टेकले होते. तर मिलिंद नगर भागात नंदिनी नदीचे पुराचे पाणी हे थेट काही लोकांच्या घरात शिरले होते. दोन दिवसांपासून शहरात पावसाचा चांगलाच कहर पाहायला मिळाला.

    नाशिकला मुसळधार पावसाचा इशारा

    नाशिक शहर सोबतच त्र्यंबकेश्वर येथे दोन दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याकडून ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर नाशिक शहराला देखील मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हा देण्यात आला होता.

    दोन दिवसांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत

    वातावरणीय बदलामुळे त्र्यंबकेश्वरवरील ढगफुटीसदृश पावसाचे संकट हे टळल्याचे दिसून आले. मात्र ७ जुलैच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते आज दिवसभर पावसाची संततधार कायम होती. या दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाले.

    दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी

    नाशिक शहरातील गोदावरी नदीला कालपासून पूर आला आहे. यानंतर आज नदीच्या पूर परिस्थितीमध्ये आणखी वाढ झाली होती. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत हे पुराचे पाणी लागले होते. यामुळे रामकुंड परिसरात पार पडणाऱ्या धार्मिक विधींवर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.

    भाविकांना रस्त्यावरच करावे लागले विधी

    देशभारतातून पंचवटी रामकुंड येथे भाविक येत असतात. मात्र गोदावरीला पूर आल्याने रस्त्याच्या कडेलाच हे पूजा विधी भाविकांना करावे लागले. यातच नंदिनी नदीला देखील मोठा पूर आला होता. नंदिनी नदी ही शहरातील अनेक प्रमुख भागातून जाते.

    अनेक पूल पाण्याखाली

    पुराचे पाणी हे नंदिनी नदीवर बांधलेल्या तिडके कॉलनी, पाखलरोड यांसह अनेक ठिकाणचे पूल हे पुराच्या पाण्याखाली गेले होते, ज्यामुळे येथून होणारी वाहतूक ही खबरदारी म्हणून प्रशासनाकडून बंद करण्यात आले होती.

    वाहनचालकांची मोठी तारांबळ

    संपूर्ण शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते हे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रस्त्यांनाच नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे एक ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी वाहनचालकांची मोठी फजिती झाली होती. काही ठिकाणी तर रस्तेच खचल्याने शाळकरी वाहने, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची वाहनेही या खचलेल्या रस्त्यातच अडकून पडले होते.

    बेळगाव ढगा इथे रस्ता खचला

    रामवाडी परिसरात एकाच वेळी शाळकरी वाहन आणि ट्रॅक्टर खचलेल्या रस्त्यात अडकून पडले होते. तर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेळगाव ढगा येथे एका बाजूचा रस्ताच पूर्णपणे खचल्याचे दिसून आले. त्यामुळे पर्याय म्हणून एकाच बाजूने वाहतूक ही सुरू करावी लागली होती.

    प्रशासनाकडून रस्त्यांची काम सुरू करण्यात आली होती. मात्र संततधार सुरू असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी येत होत्या. शहर परिसरात अनेक भागात या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे चांगलाच कहर पाहायला मिळाला.

    दोन दिवस शाळांना सुट्टी

    पावसाचा अंदाज लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून देखील खबरदारी म्हणून आज देखील मनपा हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक विद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देखील स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षामार्फत जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व घटनांकडे लक्ष ठेवून होते.

    मदत कक्षांवर संपर्क साधण्याचं आवाहन

    अद्याप देखील हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कुठेही काहीही घटना घडल्यास तत्काळ तालुक्यानुसार जारी करण्यात आलेल्या मदत कक्षावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    ६ तालुक्यांमधील शाळांना सुट्टी, पर्यटनस्थळेही बंद

    भारतीय हवामान खात्याकडून (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी उद्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ९ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील पूर्व प्राथमिक (Pre-school) तसेच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी याबाबत माहिती दिली.

    तालुकानिहाय मदत कक्ष क्रमांक

    1. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2310523
    2. नांदगाव – दूरध्वनी क्र.02552-242032
    3. मालेगाव मध्य – दूरध्वनी क्र. – 02554-253114
    4. मालेगाव बाह्य- दूरध्वनी क्र. 02554-233115
    5. बागलाण – दूरध्वनी क्र. 02555-223038
    6. कळवण – मो. क्र. 8208481669, 7588106863
    7. सुरगाणा – मो. क्र. 9923693032, 7720039096
    8. चांदवड – मो. क्र. 9403159869, 9922908806
    9. देवळा – दूरध्वनी क्र. 02592-228554, 9623263799
    10. येवला – दूरध्वनी क्र. 02559-299405
    11. सिन्नर – दूरध्वनी क्रमांक – 02551-220028, 8446320617
    12. निफाड – दूरध्वनी क्र.02550-295174
    13. दिंडोरी – मो.क्र. 9405824525
    14. पेठ – दूरध्वनी क्रमांक. 02558-225531
    15. नाशिक पूर्व – दूरध्वनी क्रमांक 0253-2310656
    16. नाशिक मध्य – दूरध्वनी क्रमांक 0253-2972124
    17. नाशिक पश्चिम – दूरध्वनी क्रमांक 0253-2232346
    18. देवळाली – मो.क्र 9284635369
    19. इगतपुरी – दूरध्वनी क्रमांक 02553-244009
    20. त्र्यंबकेश्वर – दूरध्वनी क्र. 02594-233355
    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा