Mumbai Bhandup Electric BEST Bus Accident : बस चालकाने वाहन रिव्हर्स घेतले, त्यावेळी बसचा मागील भाग त्या पादचाऱ्याला धडकून अपघात झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शहरात बेस्टच्या बसमुळे होणाऱ्या अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. मुंबईतील भांडुप पश्चिम भागात बुधवारी सकाळी ‘बेस्ट’ बसची धडक बसल्याने ४३ वर्षीय पादचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘बेस्ट’ नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार ८ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भांडुप पश्चिममधील कोकण नगर येथे घडली. ओशिवरा डेपोतून A-425/32 या मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक ४०४७ चा या अपघातात समावेश होता.
रिव्हर्स घेताना पादचाऱ्याला चिरडलं
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४३ वर्षीय जखमी व्यक्तीचे नाव अतुल अनंत पडवे असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोकण नगरच्या दिशेने उजवीकडे वळण घेत असताना बस चालकाला योग्य प्रकारे वळण घेता आले नाही. त्यानंतर चालकाने वाहन रिव्हर्स घेतले, त्यावेळी बसचा मागील भाग त्या पादचाऱ्याला धडकला. Mumbai Crime : कॉन्स्टेबलशी दोन वर्ष प्रेमसंबंध; 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळेसोबत काय घडलं? डायरीत मोठे खुलासे
मदतीला आलेल्यांचा बसला धक्का
अतुल पडवे हे झाडाची मोठ्या आकाराची कुंडी आणि बसच्या मागील भागाच्या मधोमध अडकले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बसला धक्का दिला; त्यामुळे बस पुढे सरकली आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही बस पार्किंगच्या जागेत उभ्या असलेल्या दोन बाईक आणि एका रिक्षावर जाऊन आदळली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातात पडवे यांच्या दोन्ही मांड्यांवर आघातामुळे दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. बस वाहकाने त्याला वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले.
Imtiaz Jaleel | इम्तियाज जलीलांच्या एका कॉलने पुणे पोलिसांत उडाली खळबळ!
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अपघातस्थळी एक विशेष बस निरीक्षक आणि संबंधित अधिकारी तैनात करण्यात आले होते. भांडुप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पडवे यांच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील मिळालेला नाही. तसेच बस मागे घेताना पाळण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांसह अपघातास कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाचीही संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. Siya Goyal : लॉजमध्ये चेतनने सियाच्या कपाळी सिंदूर लावलं, चार महिन्यापूर्वी गुपचूप लग्न, चॅटिंग-फोटोवरुन खळबळजनक दावे
प्लाझाजवळ बस अपघात
याआधी जून महिन्यात, दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमाजवळ असलेल्या वीर कोतवाल गार्डनजवळ ‘बेस्ट’ बसने एका कारला आणि दुचाकीला धडक दिली; या अपघातात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर होती.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा