• Thu. Aug 27th, 2026

Pimpri Chinchwad Two Workers Die in Chamber : गेल्या वर्षीही याच परिसरात अशाचप्रकारे चेंबरमध्ये अडकून दोघांचा जीव गेला असताना, पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

निगडी चेंबरमध्ये अडकून कामगारांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : निगडी प्राधिकरण परिसरात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकमान्य हॉस्पिटलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अमोल शिंदे (वय 20) आणि मनोज शिंदे (वय 26) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही कामगारांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

12 वाजेच्या सुमारास दोघे अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चेंबरमध्ये अडकलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Maharashtra TimesTakarkheda Crime : पहाटे लेकरांसह घराबाहेर पडले, थोड्याच वेळात आक्रित घडलं, जळगावात आई-बापासह दोन लेकरांची रेल्वे ट्रॅकवर बॉडी; घातपाताचा संशय

मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

अथक प्रयत्नांनंतर दोन्ही कामगारांना चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केलं. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान, या कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चेंबरमध्ये विषारी वायू किंवा ऑक्सिजनची कमतरता यांसारख्या कारणांची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्यावर्षी तिघांचा मृत्यू

विशेष म्हणजे, गेल्यावर्षी याच परिसरात चेंबरमध्ये अडकून तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही पुन्हा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्यानं प्रशासनानं या धोकादायक चेंबरबाबत योग्य ती खबरदारी घेतली होती का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. वारंवार अशा दुर्घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणांकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Maharashtra TimesGanesh Idols :गणपती बाप्पाला सुद्धा द्यावं लागणार फिटनेस सर्टिफिकेट ? गणेशोत्सव मंडळांमध्ये चिंतेचं वातावरण; मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

कुलूप तोडताच पायाखालची जमीन सरकली!

तीस वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पालघर शहरातील जुना सातपाटी रोड परिसरातील एका इमारतीच्या सदनिकेत आढळला आहे. पूजा मिश्रा (वय ३०) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा मिश्रा आणि त्यांचे पती चंदन मिश्रा या दोघांचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. मिश्रा दाम्पत्य पालघर शहरातील जुना सातपाटी रोड परिसरातील घोडेला गार्डन परिसरातील फनेल या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक २०१ मध्ये येथे वास्तव्यास होते. पूजाचे भाऊ प्रदीप कुमार मिश्रा बहिणीला शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून सातत्याने फोन करत होते. मात्र पूजा यांनी फोन उचलला नाही, त्यानंतर काही वेळाने त्यांचा फोन बंद येऊ लागला.

घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी

दोन दिवस सतत संपर्क करण्याचा प्रयत्न पूजाचे भाऊ प्रदीप यांनी केला. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नाही. आपल्या बहिणीसोबत नेमके काय झाले, या चिंतेत असलेले भाऊ प्रदीप सोमवारी थेट सुरत येथून बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी दाखल झाले. बहीण वास्तव्य करत असलेल्या इमारतीच्या सदनिकेबाहेर प्रदीप मिश्रा पोहोचले असता सदनिकेच्या दरवाज्याला कुलूप असल्याचे व दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. सदनिकेच्या आतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे देखील त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने 112 नंबरवर फोन करून पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर पोलीस कर्मचारी प्रविण पाटील आणि राजेश वायझडे यांच्यासह पालघर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा