• Wed. Jul 8th, 2026

    Dombivli Mahesh Mhatre : ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण, महिलेला धक्काबुक्की, डोंबिवलीत शिवसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी; श्रीकांत शिंदेंचं मोठं पाऊल

    Dombivli Mahesh Mhatre : ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण, महिलेला धक्काबुक्की, डोंबिवलीत शिवसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी; श्रीकांत शिंदेंचं मोठं पाऊल

    Shrikant Shinde on Dombivli Shiv Sena Corporator Mahesh Mhatre : डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    डोंबिवली मारहाण प्रकरण महेश म्हात्रे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे (डोंबिवली) : डोंबिवलीत काल मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. एका क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आपल्या प्रभागातील एका गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्यानं रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना बेदम मारहाण केली. तर एका महिला डॉक्टरला देखील धक्काबुक्की करत अरेरावी आणि दमदाटी केली. रुग्णालयातील हा सर्व प्रकार तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून निषेध

    रमेश म्हात्रे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत मारहाण करत असल्याचं त्यांचं संतापजनक कृत्य CCTV फुटेजमध्ये कैद झालं आहे. फुटेजमध्ये महिला डॉक्टर फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा हाताला जोराचा झटका देऊन मोबाईल खाली पाडल्याचंही दिसून येत आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत कारवाई दोषींवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त करत ट्वीट केलं आहे.

    Maharashtra TimesSiya Goyal : लॉजमध्ये चेतनने सियाच्या कपाळी सिंदूर लावलं, चार महिन्यापूर्वी गुपचूप लग्न, चॅटिंग-फोटोवरुन खळबळजनक दावे

    डॉ. श्रीकांत शिंदेंचं ट्वीट

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

    पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे.
    Maharashtra TimesCrime News: व्हॉट्सॲप स्टेटसने घात केला; तरुणाच्या घरावर दरोडा पडला, सीसीटीव्ही चेक करताच मित्राचा भांडाफोड!

    डॉक्टर्समध्ये संतापाची लाट

    दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरसेवकांसह त्यांच्या सहकाऱ्यांचाही मारहाणीत सहभाग असल्याचं समोर येत असल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा