• Thu. Aug 27th, 2026

४ ते  ६ जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 3, 2026
४ ते  ६ जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज – महासंवाद

मुंबई, दि ३: मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916

पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873

ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827

ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101

पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42

००००

Shilpa Gaware Case : रक्षाबंधनच्या आधीच बहिणीचा मृत्यू; इस्त्रीने चटके देत मारहाण केल्याचा आरोप, 17 वर्षे छळ सोसला, शिल्पाचा संशयास्पद मृत्यू, भावाचा दावा
Solapur News : अजित दादांची थीम असणारी वावडी उडत असताना तरुणही हवेत उडायला लागला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Thane News : ठाण्यात क्लस्टरविरोधात धडक मोर्चा, हजारो नागरिक क्लस्टर कार्यालयावर धडकले, नियोजनशून्य कारभाराचा आरोप, आंदोलकांकडून संताप व्यक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed