• Thu. Jul 2nd, 2026
    Simhastha Kumbh Mela : 1 हजार 230 कोटींचा निधी, ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी खालच्या पातळीचं काम; कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या रस्तेकामांचं धक्कादायक वास्तव समोर

    Nashik Simhastha Kumbh Mela Concrete Road Cracks : ‘विकासकामांच्या गुणवत्तेबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट आहे. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई होईल. नागरिकांच्या पैशांचा योग्य विनियोग होणे ही आमची जबाबदारी आहे’, असं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटलं आहे.

    नाशिक काँक्रिट रस्त्याला तडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्लपर्यंत सुरु असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान वेद मंदिराजवळ २५ मीटरपर्यंत तडे गेल्याचे समोर आले आहे. खुद्द पालिका आयुक्च मनीषा खत्री यांनी तपासणी केल्यानंतर ठेकेदाराला दणका देत निकृष्ट कामाप्रकरणी प्रतिदिन एक लाख ८४ हजारंचा दंड ठोठावला आहे.

    बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात १,२३० कोटी रुपये खर्चून सुरु असलेल्या २८ रस्तेकामांच्या तपासणीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत असतानाही ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे उघड झाले आहे. रस्तेकामात अनियमितता आढळून आल्यानंतर बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतरही ठेकेदार पालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील १,२३० कोटी रुपये खर्चून २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत या रस्तेकामांवर नियंत्रण ठेवले जात आहे. विहित कालावधीत ही कामे पूर्ण होण्यासाठी कामांचे टप्पे ठरवून देण्यात आले असून, त्यानुसार कामांची प्रगती तपासली जात आहे.
    Maharashtra TimesMumbai-Vadodara Expressway: मुंबईतून नवा १५७ किमी लांब द्रुतगती महामार्ग, ऑगस्टमध्ये प्रवासासाठी खुला होणार; कुठून-कुठे जोडणार?

    कामांची ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी गुणवत्तेत तडजोड

    त्रयस्थ संस्थेमार्फतही या कामांचा दर्जा तपासला जात आहे. कामांची ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी ठेकेदारांनी गुणवत्तेत तडजोड केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक रस्तेकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यासह घाईघाईत काम केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात आयुक्त मनीषा खत्री यांनी याबाबतची तपासणी केल्यानंतर बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानंतरही ठेकेदारांच्या कामात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. त्र्यंबकरोडवर खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नलपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. हे काम मेसर्स अजमेरा या ठेकेदाराला देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात डक्टच्या निकृष्ट कामाप्रकरणी याच ठेकेदाराला ५० हजारांचा दंड ठोठावला होता.

    नव्या रस्त्यालाच पडले तडे

    बॉश सर्कल परिसरातील वेद मंदिरासमोर सुरु असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात गुणवत्तेच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी काँक्रीटच्या काही पॅनलमध्ये मानकांपेक्षा अधिक तडे (क्रॅक्स) आढळून आले. कामाची गुणवत्ता अपेक्षित निकषांनुसार नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित भाग काढून टाकण्याचे, तसेच नवीन करण्याचे आदेश देतानाच कामातील त्रुटींची दखल घेत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ठेकेदाराला नोटीस बजावत प्रतिदिन एक लाख ७४ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
    Maharashtra TimesNashik News : वारीने जीवदान दिले अन् व्यसन सुटले! महिला वारकरी सुमनबाईंची डोळ्यांत पाणी आणणारी भावना, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीच्या दिशेने

    धक्कादायक वास्तव समोर

    २५ मीटरपर्यंत काँक्रीट रस्त्यास तडे गेल्याचे समोर

    १,२३० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
    २८ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात सुरु

    १,८४,००० रुपये प्रतिदिन ठेकेदारास ठोठावला दंड

    १२ ठेकेदारांवर यापूर्वीच झाली आहे कारवाई

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा