Indian Railways: भारतीय रेल्वेने नवे नियम लागू केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता २५० ऐवजी ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील शिस्त आणि नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी ‘जन विश्वास अधिनियमां’तर्गत विविध गुन्ह्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. आता रेल्वेचे अधिकृत कर्मचारी थेट घटनास्थळावरच दंड आकारू शकतील. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
साडेचार लाखांचा दंड वसूल
मध्य रेल्वेतील पुणे हा महत्त्वाचा रेल्वे विभाग असून, येथून दररोज पावणेदोन लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने ४ लाख ३१ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २७ कोटी १४ लाख इतका, तर मध्य रेल्वेने ३८ लाखांहून अधिक फुकटे प्रवासी पकडून, त्यांच्याकडून सव्वा दोनशे कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला. फुकट्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेने आता दंडामध्ये दुपटीने वाढ केली आहे. पुणे रेल्वे विभागाने नवीन तरतुदींनुसार ५१५ गुन्हे दाखल करून, साडेचार लाखांचा दंड वसूल केला आहे.
Train Ticket Refund Rules : ट्रेनचा प्रवास झाला तरी पैसे परत मिळतील, रेल्वेचा ‘हा’ नियम 90 टक्के प्रवाशांना माहितीच नाही
या सुधारित नियमावलीनुसार, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता किमान ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. पूर्वी हा दंड २५० रुपये होता. दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास केल्यास, तिकीट जप्त होऊन किमान ५०० रुपये दंड आकारला जाईल. रेल्वे परिसरात विनापरवाना विक्री केल्यास दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड, तर पुन्हा तोच गुन्हा केल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
इतर गुन्ह्यांसाठी काय शिक्षा?
रेल्वे परिसरात नशा करून उपद्रव करणे किंवा प्रवाशांच्या सुविधांचे नुकसान करणे या गुन्ह्यांसाठी किमान एक हजार रुपयांपासून पाच हजारांपर्यंत दंड किंवा सामूहिक सेवेची शिक्षा होऊ शकते. या व्यतिरिक्त, रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश केल्यास ५०० रुपये, आरक्षित सीट रिकामी करण्यास नकार दिल्यास दोन हजार रुपये आणि महिलांच्या डब्यात अनधिकृत प्रवेश केल्यास अडीच हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. धूम्रपान करणाऱ्यांवरही कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आता थेट दोन हजार रुपये दंड आणि तिकीट जप्तीची कारवाई होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे परिसरात कोणतीही प्रतिबंधित किंवा घातक वस्तू वाहून नेणे आता अतिशय गंभीर मानले गेले असून, त्यासाठी किमान १० हजार रुपयांचा दंड होईल.
या निर्णयामुळे विनातिकीट प्रवासामुळे होणारा महसूल तोटा कमी करण्यास मदत होईल आणि आसन उपलब्धता सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे. गर्दीच्या मार्गांवर जिथे अनधिकृत प्रवासामुळे अस्सल प्रवाशांची गैरसोय होते तिथे मोठा फायदा होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा