• Tue. Jun 30th, 2026
    Nashik Traffic Updates : नाशिकमध्ये संत निवृत्तिनाथ महाराज पालखी मार्गात बदल, द्वारकाऐवजी ट्रॅक्टर हाऊसमार्गे जाणार; शहरातील पालखीमार्ग वाचा सविस्तर

    Saint Nivruttinath Maharaj Palkhi Traffic Changes : आज मंगळवारी रोजी सातपूर येथे संत निवृत्ती महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम असणार आहे. उद्या बुधवारी पंचायत समितीमार्गे रामकुंड, काळाराम मंदिरमार्गे गणेशवाडीत मुक्काम असणार आहे. त्यानंतर गुरुवारी २ जुलै रोजी पळसे गावात मुक्काम केल्यावर शुक्रवारी ३ जुलैला नाशिक ग्रामीण हद्दीतून पालखी मार्गस्थ होणार आहे.

    नाशिक संत निवृत्तिनाथ महाराज पालखीमार्ग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा तीन दिवस नाशिक शहरातून पुढे मार्गस्थ होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केले आहेत. वाहतूक उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. दरवर्षी द्वारकावरून पुढे जाणारी पालखी यंदा ‘ग्रेड सेप्रेटर’च्या कामांमुळे नानावलीतून ट्रॅक्टर हाऊसमार्गे काठेगल्ली सिग्नल या मार्गाने पुढे जाणार आहे. या निमित्ताने तीन दिवस (पालखी मार्गस्त होताना) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

    शहरातील वाहतूक मार्गात बदल

    शहरातून पालखी सोहळा आज मंगळवारी (दि. ३०) सुरू होणार असून सातपूर, पंचवटी आणि पळसे गावातील मुक्कामानंतर शुक्रवारी (दि. ३) नाशिक ग्रामीण हद्दीतून पालखी पुढे जाईल. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी शहरात आज, ३० जूनला सकाळी ६.३० ते ३ जुलै सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी काढले आहेत. आदेशातील निर्बंध पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमनदलाची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच ऐनवेळी परिस्थितीप्रमाणे वाहतूक वळविण्यासंदर्भात मार्गात बदल करण्याचे अधिकार राखून ठेवल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
    Maharashtra TimesAshadhi Ekadashi 2026 : वारी चुकायाची नाही! निवृत्तिराया निघाले पांडुरंगा भेटी; कपाळी गंध-बुक्का, डोईवर तुळस, हाती टाळ, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान

    शहरातील पालखीमार्ग

    पहिला टप्पा : पिंपळगांव बहुला – समृद्धी टी पॉइंट – पपाया नर्सरी चौक – महिंद्रा सर्कल – सातपूर गाव (मुक्काम)

    दुसरा टप्पा : आयटीआय सिग्नल – एबीबी सिग्नल – पंचायत समिती – जलतरण तलाव – मोडक सिग्नल – सीबीएस – मेहेर सिग्नल – अशोकस्तंभ – रविवार कारंजा – धुमाळ पॉइंट – संत गाडगे महाराज पुतळा – दामोदार टॉकीज – बादशाही कॉर्नर – दूधबाजार चौक – म.फुले मंडई – काजीपुरा चौकी – विठ्ठल मंदिर – आझाद चौक – शिवाजी चौक – शितळादेवी मार्गे गणेशवाडी आयुर्वेद विद्यालय (मुक्काम)

    तिसरा टप्पा : नानावली रस्त्यावरुन ट्रॅक्टर हाऊस – घोडेस्वार बाबा दर्गा डावीकडे रवींद्र विद्यालय – बनकर चौक – काठेगल्ली मंदिर सिग्नल – बिटको सिग्नल – मुक्तीधाम मंदिर परत विरुद्ध बाजूने बिटको सिग्नल – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – नाशिकरोडमार्गे सिन्नर फाट्यावरुन पळसे गाव (मुक्काम)
    Maharashtra TimesPabe Ghat Accident : जेवणाचं दुपारी कॉल करुन सांगतो, विश्वासचा आईला फोन ठरला अखेरचा, कुटुंबाने शेंडेफळ गमावलं, पहाटे साडेतीनला काळीज चिरणारी बातमी

    प्रवेश बंद पालखी मार्गस्थ होईपर्यंत

    नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर सातपूर पोलिस ठाणे ते संस्कृती हॉटेलपर्यंत

    मायको सर्कल ते एबीबी सिग्नलपर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर सर्व वाहनांना प्रवेश बंद

    त्र्यंबकनाका सिग्नल ते अशोकस्तंभापर्यंत एका बाजूने सर्व वाहनांना प्रवेश बंद

    रविवार कारंजा, धुमाळ पॉइंट, संत गाडगे महाराज पुतळा, फुले मंडईकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद

    नाशिकरोड – पुणे महामार्ग – द्वारका – काठेगल्ली एक बाजू पूर्णत: बंद

    दत्त मंदिर सिग्नल – बिटको चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा