• Sat. Aug 15th, 2026
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर


Marathi News Live: शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपरफुटीचे धागेदोरे बिहार, हरियाणा, आग्रा, दिल्लीसह इतर राज्यांतही पसरले असल्याचा पोलिसांना संशय असून, यात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.हवामान विभागाने २ जुलैपासून कोकण विभागात आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आता पावसाळी वारे अधिक सक्रिय होताना दिसत असून, सिंधुदुर्गात १ आणि २ जुलै; तर रत्नागिरी, रायगडला २ जुलै रोजी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालय आज, सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप याचा फैसला आज होणार असून, या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed