छत्रपती संभाजीनगर, दि. १५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विभागीय माहिती कार्यालयाच्या प्रांगणात उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसंचालक (माहिती) टाके यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहायक संचालक (माहिती) सुरेश पाटील यांच्यासह विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्रातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.