• Sat. Aug 15th, 2026

बुधगाव ग्रामपंचायतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

सांगली, दि. १५ (जिमाका): बुधगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा परिषद स्वनिधी यांच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

कृष्णाई हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी आमदार दिनकर पाटील, सरपंच वैशाली पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य पूजा एडके, पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदि उपस्थित होते.

उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी आदर्श काम उभारावे. प्रत्येकाने विकसित भारताचे स्वप्न जगले पाहिजे. आदर्श काम उभारत विकसित देश घडवण्यासाठी योगदान दिले पाहिजे. शासन आणि शासकीय योजनांच्या मदतीने गावांनी स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा. शहराकडील स्थलांतर थांबवण्यासाठी गावातच मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे ते म्हणाले.

खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून मोठ्या ग्रामपंचायतींना सौर ऊर्जा प्रकल्प द्यावेत, अशी मागणी केली. तर हरिपूर, बिसूर आणि नांद्रे येथेही सौरऊर्जा प्रकल्प बसवावेत, अशी विनंती आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी केली. त्यावर संपूर्ण आराखड्यासह याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना टेबलफॅनचे वितरण करण्यात आले. तसेच, 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त छत्री व रेनकोटचे वितरण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व नागरिकांना यावेळी करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा तक्रार निवारण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed