• Mon. Jun 29th, 2026
    Train Ticket Refund Rules : ट्रेनचा प्रवास झाला तरी पैसे परत मिळतील, रेल्वेचा ‘हा’ नियम 90 टक्के प्रवाशांना माहितीच नाही

    Railway ticket refund rules: भारतीय रेल्वेच्या रिफंड नियमांबद्दल माहिती आहे का? ट्रेन रद्द होणे, उशीर होणे किंवा श्रेणी बदलून प्रवास करावा लागल्यास तिकीटाचे पैसे कसे परत मिळतात, सविस्तर नियम जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. अनेकांना वाटतं की, ट्रेनचा प्रवास पूर्ण झाला की तिकीटाचे पैसे परत मिळत नाहीत. पण हे पूर्णपणे खरं नाही. भारतीय रेल्वेच्या काही नियमांनुसार प्रवास संपल्यानंतरही काही परिस्थितीत तिकीटाचे पैसे किंवा भाड्यातील फरक परत मिळू शकतो. मात्र, त्यासाठी काही अटी आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

    समजा, तुमच्याकडे एसी किंवा उच्च श्रेणीचे तिकीट आहे. पण काही कारणामुळे तुम्हाला खालच्या श्रेणीच्या डब्यात प्रवास करावा लागला. अशा वेळी तुम्ही भाड्यातील फरक परत मागू शकता. मात्र, त्यासाठी प्रवासादरम्यानच टीटीईकडून ‘लोअर क्लास सर्टिफिकेट’ (एलसीसी) घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच रिफंडचा दावा करता येतो.

    कधी मिळते भाड्यातील फरकेची रक्कम?

    रेल्वेच्या कारणामुळे तुम्हाला आरक्षित वर्गाऐवजी कमी श्रेणीच्या डब्यात बसवण्यात आले असेल, तर टीटीई एलसीसी देतो. त्यानंतर उच्च आणि निम्न श्रेणीच्या तिकीटातील भाड्यातील फरकेची रक्कम तुम्हाला परत मिळू शकतो.

    Maharashtra TimesPune Crime: केतन प्रकरणात साहिलची एन्ट्री, सिया अडचणीत; जवळचा माणूस अनेक रहस्य उलगडणार, चौकशी सुरू

    या तीन परिस्थितीत मिळू शकतो रिफंड

    1. ट्रेन पूर्णपणे रद्द झाली, तर तिकीटाचे संपूर्ण पैसे परत मिळतात. यासाठी टीडीआर दाखल करण्याची गरज नसते.
    2. ट्रेनचा काही भाग रद्द झाला किंवा ट्रेनचा मार्ग बदलला, तरही रिफंड मिळू शकतो. मात्र, अशा वेळी टीडीआर दाखल करावा लागतो.
    3. ट्रेन नियोजित वेळेपेक्षा तीन तास किंवा त्याहून अधिक उशिराने धावत असेल आणि त्यामुळे तुम्ही प्रवासच केला नसेल, तर संपूर्ण भाड्याचा परतावा मिळू शकतो. यासाठी वेळेत टीडीआर दाखल करणे आवश्यक आहे.

    दरम्यान, अनेक प्रवाशांना या नियमांची माहिती नसल्याने ते रिफंडसाठी अर्जच करत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती तुमच्यासोबत घडली, तर टीटीईकडून आवश्यक प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. तसेच, ज्या ठिकाणी टीडीआर दाखल करणे आवश्यक आहे, ते तुम्ही वेळेत केल्यास तुम्हाला रेल्वेच्या नियमानुसार भाड्यातील फरकेची रक्कम किंवा संपूर्ण तिकीट रक्कम परत मिळू शकते.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा