• Sun. Jun 28th, 2026
    Vadhavan Port Highway: 208 खारफुटींवर कुऱ्हाड; वाढवण बंदरासाठी झाडे तोडण्यास न्यायालयाचा हिरवा कंदील

    Vadhavan Port Mangroves: हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगातील अव्वल दहा कंटेनर बंदरांपैकी एक ठरेल, असा दावा करण्यात येत आहे.

    वाढवण बंदर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : पालघर जिल्ह्यातील नियोजित महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ची जोडणी देण्यासाठी किनाऱ्यालगतच्या भराव क्षेत्रात प्रवेश मार्ग उभारण्याकरिता २०८ खारफुटीची झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार आहे.

    खारफुटींच्या योग्य संरक्षणाच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने पूर्वी दिलेल्या कायमस्वरूपी आदेशाप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खारफुटींच्या तोडीसाठी याचिकेद्वारे परवानगी मागितली होती. सविस्तर सुनावणीअंती, ‘हा व्यापक आर्थिक महत्त्व असलेला सार्वजनिक हिताचा प्रकल्प आहे’, असे नमूद करत न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने याचिका मंजूर केली.

    Maharashtra TimesSanjay Dina Patil : अखेर संजय दिना पाटील यांचा माफीनामा, पत्रकारांसोबतच्या वादावर जाहीर दिलगिरी व्यक्त
    वाढवण बंदरालाराष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८शी जोडता यावे यादृष्टीने आठ पदरी नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गाच्या बांधकामासाठी ‘एनएचएआय’ने आवश्यक पर्यावरण, किनारपट्टी नियमन क्षेत्र तसेच वनविषयक परवानग्या प्राप्त केल्या होत्या. तसेच भरपाई स्वरूपातील वनीकरणाच्या अटींचीही पूर्तता केली होती. त्याअनुषंगाने अडथळा असलेली २०८ खारफुटींची झाडे तोडण्यास अंतिम मंजुरी मागितली होती.

    ‘हा प्रकल्प व्यापक जनहिताचा आहे. वाढवण बंदर हे ‘लँडलॉर्ड पोर्ट डेव्हलपमेंट मॉडेल’वर विकसित करण्यात येत असून, त्यामुळे भारताला जगातील अव्वल दहा कंटेनर बंदरांच्या यादीत स्थान मिळवण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच या प्रवेश मार्गामुळे वाढवण बंदरासाठी अत्यावश्यक दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘एनएचएआय’ने भरपाई स्वरूपातील वनीकरणाच्या सर्व अटींचे पालन केले आहे. तसेच ३० हेक्टर क्षेत्रावर १ लाख ३३ हजार खारफुटींच्या रोपांची लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय खारफुटी भरपाईसाठी चार कोटी ८३ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली आहे. तसेच वनपरवानगीच्या अटींनुसार आवश्यक असलेले इतर आर्थिक शुल्कही अदा केले आहेत’, असे खंडपीठाने याचिका मंजूर करताना निर्णयात नमूद केले.

    Maharashtra TimesTukaram Mundhe : डॅशिंग तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका, महिन्याभरात तब्बल 34 कोटींचा गुटखा जप्त
    वाढवण बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांच्याकडून संयुक्तपणे विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पात प्रत्येकी एक हजार मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स, चार बहुउद्देशीय धक्के, चार द्रव मालवाहतूक धक्के, एक रो-रो धक्का आणि तटरक्षक दलासाठी स्वतंत्र धक्का असेल.

    Maharashtra TimesOperation Tiger: पाच तयार होते, सहावा खासदार ऐकेना! CM फडणवीसांनी कसं मन वळवलं? पडद्यामागे काय काय घडलं?
    नियोजित वेळेत प्रकल्पपूर्ती
    ‘या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचे प्रलंबित मुद्दे निकाली निघाले आहेत. आता प्रकल्प पूर्ण क्षमतेने पुढे नेला जाईल. विविध मंजुऱ्या, पायाभूत सुविधा विकास आणि संबंधित घटकांमधील समन्वय या सर्व स्तरांवर झालेली प्रगती ही प्रकल्पाच्या नव्या टप्प्याची सुरुवात आहे. यामुळे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याचा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे’, असे न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड’चे (व्हीव्हीपीएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा