Pune Railway Track Accident: रेल्वेप्रवासी काही वेळा रेल्वे पकडणे किंवा फलाट बदलण्याच्या नादात शॉर्टकट म्हणून रेल्वे रुळाचा वापर करतात. त्यामुळे घाईत रूळ ओलांडताना लक्ष नसल्याने अनेकदा अपघात होतात; तसेच काहीजण रेल्वेखाली आत्महत्यादेखील करीत असल्याचे आढळून आले.
पुणे रेल्वे विभागातून दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांची कायम गर्दी असते. काही प्रवाशांकडून गाडी पकडण्यासाठी ‘शॉर्ट कट’ मार्गाचा अवलंब केला जातो. अशा वेळी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी थेट रूळ ओलांडून जातात. तितक्यात गाडी आल्यास जीवाला मुकावे लागते. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये; म्हणून रेल्वे पोलिसांकडून अनेक उपाययोजना केल्या आहेत; परंतु प्रवाशांच्या चुकीमुळे रेल्वेच्या अपघातात बळी पडतात.
Siya Goyal : केतनने खूप जीव लावला, आदर दिला, मुलासारखाच होता; सिया गोयलच्या पालकांनी पहिल्यांदाच सोडले मौन, लेकीच्या कृत्यावर म्हणाले…
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेतली जाते. तशा सूचनाही वारंवार केल्या जातात. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास नियम पायदळी तुडवतात. परिणामी अपघाताच्या घटना घडत आहेत. पुणे, दौंड आणि मिरज या प्रमुख स्थानक परिसरात अशा घटना जास्त असून, त्या ठिकाणी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे.
हेडफोन ठरताहेत जीवघेणे
प्रवासादरम्यान अनेकजण मोबाइल आणि हेडफोनमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे आजूबाजूची जाणीव राहत नाही. रूळ ओलांडताना समोरून किंवा मागून येणाऱ्या रेल्वेचा आवाजही ऐकू न आल्याने अपघात होतात. कानात हेडफोन किंवा ब्लूटूथ असताना रेल्वे परिसरात वावरणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी रूळ ओलांडताना हेडफोनचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Pune Crime: सिया-चेतनचा पाय खोलात; ‘थर्ड वेव्ह’मधलं फुटेज पोलिसांच्या हाती; ‘त्या’ 55 मिनिटांत काय घडलं?
५२३ -गेल्या दीड वर्षांत रूळ ओलांडताना झालेले मृत्यू
८७ -रूळ ओलांडताना अपघातात जखमी
अपघातांचे प्रमाण कोठे जास्त ? -पुणे, दौंड, मिरज स्थानकांचे परिसर
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविली जाते. अनेक ठिकाणी रूळ ओलांडणे टाळण्यासाठी तारेचे कुंपण उभारण्यात आले आहे; तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नये. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. – हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग
