Ketan Agarwal Death Case: सियाला मानसिक धक्का बसू नये म्हणून केतन अगरवाल याचा मृत्यू झाल्याची बातमी सुरुवातीला पोलिसांनी तिच्यापासून लपवली. मात्र त्यानंतर सियाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले.
पोलिसांनी केतनबद्दल ती माहिती देताच सियाला घाम फुटला, प्रचंड घाबरली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या लोहगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवला. जिच्यासोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहिली त्याच तरुणीने गाफील ठेवून घात केला आणि २५ वर्षीय तरुणाला निर्घृणपणे संपवलं. सिया गोयल आणि केतन अगरवाल यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात ते लग्न करणार होते. सियासोबत लग्न जमल्याने आनंदात असणारा केतन तिला आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी सियाच्या डोक्यात मात्र भलतंच काही शिजत होतं. सियाने प्रियकराच्या साथीने १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून धक्का देत होणारा पती केतनचा जीव घेतला. घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, केतन खाली कोसळल्यानंतर सियाची प्रतिक्रिया काय होती, याबाबत आता घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने माहिती दिली आहे.
लोहगड किल्ल्यावरून एक तरुण खाली कोसळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर तरुणासोबत असलेल्या तरुणीनेच ही माहिती दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. कर्तव्यावर तैनात असलेले राहुल नामक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा सिया ही घाबरलेल्या अवस्थेत तिथं उभी होती. मात्र तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते. केतन अगरवाल अचानक खाली कोसळला असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तिला तिथंच थांबायला सांगितलं आणि पोलीस कर्मचारी केतनचा शोध घेण्यासाठी खाली उतरले. तेव्हा गंभीर जखमी अवस्थेत केतन निपचित पडला होता. घटनास्थळीच केतनचा जीव गेल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली. मात्र आपल्यासोबत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्का सियाला सहन होणार नाही, असा विचार करून पोलिसांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि केतनची प्रकृती ठीक असल्याचं तिला सांगितलं. मात्र केतन ठीक असल्याचं कळताच सिया प्रचंड घाबरली असल्याची माहिती आता पोलीस कर्मचारी राहुल यांच्याकडून देण्यात आली आहे. याबाबत ‘Zee News’ने वृत्त दिलं आहे.
केतन जिवंत राहिल्यास भांडाफोड होण्याची सियाला चिंता
सिया हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला होता. केतनला लोहगडावरून धक्का देण्यात आला. मात्र पोलिसांनी केतन ठीक असल्याचं सांगताच सियाच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं पोलीस कर्मचाऱ्याच्या माहितीतून उघड झालं आहे. केतन जर जिवंत राहिला असता तर आपलं बिंग फुटलं असतं याची धास्ती सियाने घेतली होती आणि तेच तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
दरम्यान, सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून केतन अगरवाल याला संपवलं असलं तरी किल्ल्यावर असणाऱ्या सीसीटीव्हीने दोघांचा भांडाफोड झाला असून पोलीस कोठडीत असलेल्या या दोन्ही आरोपींची सध्या कसून चौकशी केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा