• Fri. Jun 26th, 2026

    ‘दिलखुलास’मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा वेध – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 24, 2026
    ‘दिलखुलास’मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा वेध – महासंवाद

    मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, अर्थतज्ज्ञ तथा राजर्षी शाहू महाराज यांचे अभ्यासक डॉ. जे.के.पवार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार २६ जून, शनिवार, २७ जून आणि सोमवार, २९ जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले आहे.

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, सहकार, उद्योग, ग्रामविकास, कला, संस्कृती, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा या मुलाखतीत सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा, समतेच्या विचारांचा आणि आजच्या काळातील त्यांच्या कार्याच्या प्रेरणादायी वारशाचाही वेध घेण्यात आला आहे.

    कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सामाजिक न्याय दिनाचे महत्व, राजर्षी शाहू महाराजांचा लोकाभिमुख राज्यकारभार, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे क्रांतिकारी योगदान आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. दुसऱ्या भागात कृषी, जलसंधारण, सहकार, उद्योग, रोजगारनिर्मिती, ग्रामविकास, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या दूरदर्शी कार्याचा वेध घेण्यात आला आहे. तर तिसऱ्या भागात कला, संस्कृती, क्रीडा, पत्रकारिता आणि समाजप्रबोधनासाठी दिलेल्या योगदानासह त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आणि आजच्या तरुण पिढीसाठी त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शक मूल्यांचा उलगडा डॉ. जे.के. पवार यांनी केला आहे.

    0000

    जयश्री कोल्हे/ ससं

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed