Shrikant Shinde and Omraje NimbalkarTirupati Darshan : मंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर तिरुपतीत पोहोचले आहेत. त्यानी ११ किमी पदयात्रा करत श्री बालाजीचे दर्शन घेतले. त्यांच्या या दौऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यातील ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधत पक्षांतराची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठीच आपण शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांचा तिरुपती दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी तब्बल ११ किलोमीटरची पदयात्रा केल्याची माहिती समोर आली आहे.
पायी चालत तिरुपतीचे दर्शन
खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती ते तिरुमला हा सुमारे ११ किलोमीटरचा डोंगरमार्ग पायी पार करत श्री बालाजीचे दर्शन घेतले. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या दर्शनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पदयात्रेत खासदार श्रीरंग बारणे, ॲड. निलेश देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील तसेच ओमराजे निंबाळकर यांचे बंधूही सहभागी झाले होते. गुरुवारी रात्री पदयात्रेला सुरुवात करून शुक्रवारी पहाटे सर्वांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर विजयवाडा येथे जाऊन कन्यका देवीचेही दर्शन घेतल्याची माहिती आहे.
चंद्रहार पाटीलांनी शेअर केली माहिती
पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर या पदयात्रेची माहिती देत काही छायाचित्रेही शेअर केली. २५ जूनच्या रात्री १० ते पहाटे अडीच वाजेपर्यंत जवळपास ३८०० पायऱ्या चढत ११ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह सर्वांनी पहाटे श्री बालाजीचे दर्शन घेतल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. अशा वेळी दोघांनी एकत्र तिरुपती बालाजी आणि विजयवाड्यातील कन्यका देवीचे दर्शन घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. ऑपरेशन टायगरनंतर ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराची मोठी चर्चा झाली होती. आता या धार्मिक दौऱ्यानंतरही त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा