• Sat. Jun 27th, 2026
    माझ्या घरी ड्रिंक चालत नाही, पार्टीलाही पाठवणार नाही; केतनच्या आईने बजावलेलं, सियाच्या 3 गोष्टींमुळे सासूबाईंना संशय

    Pune Crime : मी सियाला मोकळेपणाने सांगितलं होतं, की माझ्या घरी ड्रिंक चालत नाही, मी तुला लग्नानंतर पार्टीलाही पाठवणार नाही. पण ती ड्रिंक करायची, असं केतनची आई राखी विशाल अगरवाल यांनी सांगितलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : केतन अगरवाल मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर अगरवाल कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सिया आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तर केतनची आई राखी अगरवाल यांनीही सियाने आपल्याला फसवल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लग्नानंतर तुला पार्टी वगैरे करता येणार नाही, हे मी तिला बजावून सांगितल्याचं त्या म्हणाल्या. तर तीन गोष्टींवरुन घातपाताचा संशय आला, असंही राखी अगरवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

    राखी अगरवाल काय म्हणाल्या?

    “आज माझा मुलगा गेला, त्याला पूर्ण जबाबदार सिया आणि तिचा प्रियकर चेतन आहेत. मी तिला लग्नाआधीपासूनच सुनेसारखं मानलं होतं. पण तिने खूप मोठा धोका दिला आणि माझ्याशी भरपूर खोटं बोलली. साखरपुड्यानंतर दोन तीन वेळा ती आमच्या घरी येऊन गेली. एकदा पुजेला आलेली. त्यामुळे पूजेच्या हिशोबाने चांगलं वागत होती. एकदा वाढदिवसाला आलेली, दोन तीन वेळा डिनरला आलेली.” असं राखी म्हणाल्या.

    VIDEO | राहूल नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

    ड्रिंक-पार्टी चालणार नाही

    “मी तिला मोकळेपणाने सांगितलं होतं, की माझ्या घरी ड्रिंक चालत नाही. पार्टीलाही मी तुला पाठवणार नाही. पण ती ड्रिंक करायची, हे आमच्यापासून लपवलं गेलं. तिच्या आई वडिलांनी आमच्यापासून लपवलं. पूजा गोयल या सगळ्यात इनव्हॉल्व आहे. या घटनेच्या दिवशी मला तिचा फोन आलेला, तुम्ही मुलाला का पाठवलंत, मी नाही पाठवलं, सिया घेऊन गेली त्याला खेचून.” अशा शब्दात राखी अगरवाल यांनी उद्विग्नता व्यक्त केली.
    Maharashtra TimesSiya Goyal : सियाने लोहगडाच्या टोकावरुन ढकललं, केतनने पडता-पडता एका झुडपाला घट्ट पकडलेलं, पण… वडिलांचा दावा, घटनास्थळाचा पहिला फोटो समोर

    तीन गोष्टींमुळे संशय

    “आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही वीस जण राहतो. एकालाही आधी तिच्यावर संशय आला नाही. ती अगदी सामान्य मुलीप्रमाणे वागायची. व्हिडिओ कॉलवर हसत खेळत बोलायची. आम्हाला कधीच शंका आली नाही. आम्ही खूप वेळा भेटलो, शॉपिंगला गेलो, डिनरला गेलो, पण सिया अशी असेल वाटलं नव्हतं. तिचे आई, वडील, आत्या, आत्याचा नवरा सगळे जबाबदार आहेत. आमच्या घरात कोणाचे अश्रू थांबत नाहीयेत, चार दिवसांपासून कोणी झोपलेलं नाहीये. सियाचे शूज सोबत नव्हते, तिचा मोबाईल आणि चेतनचा चेहरा पाहिला, तेव्हा मला संशय आला” असं केतनच्या आईने सांगितलं.

    Ketan Vishal Agrawal pune trekker Lohagad fort murder

    केतनच्या वडिलांची उद्विग्नता

    दुसरीकडे, केतनचे पिता विशाल अगरवाल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, सियाला लग्न मान्य नसताना आणि तिचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असतानाही ही बाब लपवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची फसवणूक झाली. ‘केतनच्या जीवाला यापूर्वीही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. अखेरीस १८ जून रोजी त्याची हत्या करण्यात आली,’ असा त्यांचा दावा आहे. ‘हे लग्न मान्य नव्हते, तर संबंध मोडण्याचा मार्ग खुला होता. निष्पाप मुलाचा जीव घेण्याची वेळ का आणली,’ असा संतप्त सवाल विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.
    Maharashtra TimesPune Crime : तुमची सिया अगदीच विशीची आहे हो! अगरवाल कुटुंबाने सोयरीक नाकारलेली, गोयलांचा हट्ट, केतनचं लग्न कसं जुळलेलं?
    ‘दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि या प्रकरणात साथ देणाऱ्यांचीही चौकशी व्हावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला असून, अगरवाल कुटुंबाने केलेल्या दाव्यांचीही पडताळणी तपासाचा भाग म्हणून केली जाणार आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा