• Fri. Jun 26th, 2026

    मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 30 मिनिटांत! गोल्ड लाइनसाठी ‘सिडको’कडून हालचाली सुरू; कुठे असतील स्थानकं?

    मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 30 मिनिटांत! गोल्ड लाइनसाठी ‘सिडको’कडून हालचाली सुरू; कुठे असतील स्थानकं?

    Mumbai Metro 8: मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 8साठी आवश्यक परवानग्या घेण्यासाठी सिडको सल्लागार नेमणार असून त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: नवी मुंबई आणि मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो लाइन 8 (गोल्ड लाइन)साठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मेट्रो मार्गिकेसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सिडकोने यासाठी निविदा मागवल्या असून लवकरच मुंबईहून नवी मुंबईपर्यंत प्रवास करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच, नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास सुलभ होणार आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी नव्या मेट्रो मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. ही प्रस्तावित मार्गिका 35 किलोमीटर लांब असेल आणि 20 मुख्य स्थानकं असतील. या मार्गिकेसाठी 29,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 2029पर्यंत मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्याचं उद्दिष्ट आहे.

    Maharashtra TimesMumbai Mini AC Bus : मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयीस्कर; प्रवाशांच्या ‘बेस्ट’ सेवेसाठी दीड हजार मिनी एसी बस ताफ्यात, बसचे वैशिष्ट्ये काय?

    कोणत्या परवानग्यांची आवश्यकता?

    मेट्रो मार्गिका 8साठी कोस्टल रेग्युलेशन झोन, वन वन्यजीव, खारफुटी, फ्लेमिंगो अभायरण्य आणि मिठागर अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक परवानग्या घेण्यासाठी या सल्लागाराला नेमण्यात येणार आहे. 15 महिन्यांच्या कालावधीत सर्व आवश्यक मंजुऱ्या आणि आवश्यकता असल्यास उच्च न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात येतील. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि पर्यावरण व्यवस्थापनाच्या योजना तयार करण्याचं काम देखील या सल्लागाराकडे असेल. संपूर्ण मार्गावर बाधित होणाऱ्या वृक्षांची मोजणी आणि खाफुटींच्या संरक्षनासाठी योजना तयार करण्याचंही काम या सल्लागाराचं असेल.

    मेट्रो लाइन 8 सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीने बांधण्यात येणार आहे. 25.5 किमी मार्गावर 14 उन्नत स्थानकं तर उर्वरित 9.5 किमी मार्गावर सहा भूमिगत मेट्रो स्थानकं असतील. मेट्रो लाइन 8चा मार्ग कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, वाशी, नेरुळ, सीवूड्स आणि तारघर परिसरांमधून जाणार आहे. याशिवाय या ठाणे येते नव्या खाडीपुलाचाही समावेश असेल. मंडाले येथील मिठागराच्या जमीनीवर 27.2 हेक्टरचा डेपो बांधण्याचा प्रस्ताव आहे. हा डेपो मानखुर्द येथील इंटर स्टेट बस टर्मिनसच्या जवळच असेल.

    कुठे-कशी असतील स्थानकं?

    भूमिगत स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टर्मिनल 2, फिनिक्स मॉल स्थानक, एस.जी. बर्वे मार्ग, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, आणि गरोदिया नगर या स्थानकांचा समावेश आहे. तसेच, उन्नत मार्गावर बैंगणवाडी, मानखुर्द, आय.एस.बी.टी., वाशी, सानपाडा, जुईनगर, एलपी, नेरूळ स्थानक, सीवूड्स स्थानक. अपोलो, सागर संगम, तारघर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पश्चिम आणि नवी मुंबई आंतरराष्ट्राय विमानतळ T2 या स्थानकांचा समावेश आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai Metro: नवी मुंबईत दोन मेट्रो मार्गिकांना मंजुरी, प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींचा खर्च; थेट विमानतळापर्यंत जोडणार

    यासाठी तब्बल 30.7 हेक्टर जमीन संपादित करणार असून 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी2026 मध्ये सहा महिन्यात या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. पण गेल्या सहा महिन्यात मार्गिकेच्या कामाला वेग मिळाला नसून आता सल्लागार नेमण्यात येत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा