Mumbai Monsoon: दीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसानं मुंबईला झोडपलं आहे. शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह तब्बल सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचे ढग दोन आठवड्यांसाठी गायब झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनचा वेग पुन्हा वाढला आहे आणि आता पाऊस थांबायचं नावचं घेत नाही असं वाटू लागलं आहे. जूनचे 20 दिवस उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. सोमवारी पुण्यात तर मंगळवारी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
कुठे-कुठे पाणी तुंबलं?
मान्सूनचे आगमन घोषित केल्यानंतर मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढू लागला आहे. मंगळवारी मध्यरात्री मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस बरसत आहे. सकाळी दादर, कुर्ला, माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं. पहाटे चार वाजल्यापासून तीन तासांसाठी मुंबई आणि पालघरमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यादरम्यान, शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, महाराष्ट्रासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे, संपूर्ण 36 जिल्ह्यांची A टू Z माहिती
अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या काही तासांमध्ये या भागांमधील पावसाचा जोर वाढणार असून ताशी 40 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला असला, तरी 1 ते 23 जून या कालावधीत कुलाबा येथे केवळ 75.3, तर सांताक्रूझ येथे 46मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मान्सूनची रेषा उत्तर कोकणाचा भाग व्यापून मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथेही अनेक भागांमधून प्रवास करत वर्ध्यापर्यंत पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या पश्चिम दिशेकडून येणारे वारे मान्सूनला चालना देत आहेत, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही बुधवारी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 40 किमी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांनाही येत्या 3 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवरही रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
रेल्वे वाहतूक ठप्प
दरम्यान, पहिल्या पावसात मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं दिसून आलं. ठाणे ते वाशी मार्गावर रेल्वे रुळांवर पाणी साचलं असल्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प होती. मोठ-मोठे अश्वासनं दिल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईची ही दशा झाली आहे. सकाळी निघालेल्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा मोठा खोळंबा झाल आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा