• Sun. Aug 16th, 2026

पूंछ (जम्मू) सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 23, 2026
पूंछ (जम्मू) सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

मुंबई, दि. २३ : पूंछ या जम्मूच्या सीमावर्ती भागातील युवक युवतींच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेंतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पाचपैकी तीन युवती राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू असून एका विद्यार्थिनीला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे असल्याचे तिने सांगितले. यावेळी मौलवी फरीद मलिक, शबनम परवीन, नवाझ मेहमूद, उमर अब्दुल्ला खान, मुबशीर अहमद, शाहिस्ता मजीद, आदिल मजीद, शबीना परवीन व नसीम फातिमा हे उपस्थित होते.

0000

 

Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे
रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं
Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन’, स्वातंत्र्यदिनामित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन, नेमकं काय म्हणाले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed