• Thu. Jun 25th, 2026
    केतनला लोहगडावरुन ढकलण्याचा प्रयत्न फसला, तर 20 वर्षांच्या सियाचा प्लॅन B ठरलेला; अंतःकरणापासून शाप देतोय, पित्याची भावूक पोस्ट

    Pune Lohagad Trek Groom Ketan Agarwal Death : केतनची २० वर्षीय नियोजित वधू सिया प्रविण बसेसर गोयल, तिचा मित्र आणि अन्य साथीदारांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बंडू येवले, लोणावळा, पुणे : लोहगड किल्ल्यावरुन दरीत पडून २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. नियोजित वधूने केलेल्या दाव्याप्रमाणे केतन हा सेल्फी काढताना अपघाताने ४०० फूट खोल दरीत पडला नसून होणाऱ्या बायकोनेच त्याला दरीत ढकलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात केतनची २० वर्षीय नियोजित वधू सिया प्रविण बसेसर गोयल, तिचा मित्र आणि अन्य साथीदारांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले. लोणावळा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धक्कादायक म्हणजे लोहगडावरुन ढकलण्याचा प्लॅन फेल गेला, तर महाबळेश्वरला नेऊन त्याची हत्या करण्याचा कटही ठरला होता.

    सियाचा कांगावा

    होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेले असताना दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवालच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले. सुरुवातीला अपघात मानला गेलेल्या या घटनेत घातपात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. सेल्फी घेताना जोरदार वारे वाहत असल्याने केतनचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला, असा कांगावा सियाने पोलिसांसमोर केला होता. परंतु सखोल पोलीस तपासात तिचं पितळ उघडं पडलं.

    VIDEO | एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील एन्ट्रीवेळी नेमकं काय घडलं?

    विशाल अग्रवाल यांची सोशल मीडिया पोस्ट

    केतनचे पिता विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट समोर आली आहे. पुण्यातील सिया प्रवीण बसेसर गोयल या धूर्त मुलीने—जिचे आधीपासूनच अनैतिक संबंध होते—आमचा साधा-भोळा मुलगा केतन याच्याशी एक बनावट विवाह रचला. तिच्या चारित्र्याबद्दल आणि भूतकाळातील वागणुकीबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला व नातेवाईकांना पूर्ण कल्पना होती; तरीही त्यांनी जाणीवपूर्वक सत्य लपवून ठेवले आणि आमची मोठी फसवणूक केली, असं अग्रवाल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. आम्हा पीडित पालकांच्या अंतःकरणातून शाप आणि न्यायासाठीचा आक्रोश होत आहे, असंही ते म्हणतात.
    Maharashtra TimesNagpur Crime : दार तोडताच भयंकर दृश्य, नागपुरात ४२ वर्षीय डॉक्टरचा वेदनादायी अंत, कौटुंबिक कलहाची दुर्दैवी अखेर झाल्याची चर्चा

    मुलाचा जीव घेण्याची काय गरज?

    त्या मुलीने यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. अखेरीस, १८ तारखेला तिने—त्याच मित्राच्या मदतीने—आमच्या मुलाचा निर्घृणपणे जीव घेतला. समाजाला आमचा एकच प्रश्न आहे: जर त्या मुलीचे वागणे असे होते, तर संबंध सहजपणे तोडता आले असते; मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची काय गरज होती? या कधीही भरून न येणाऱ्या हानीची भरपाई कोण करणार? असा उद्विग्न सवाल विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा