• Tue. Jun 23rd, 2026
    होणाऱ्या बायकोनेच जीव घेतला! लोहगडावरुन दरीत पडून तरुणाच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; नियोजित वधू, मित्रासह 8 जणांवर गुन्हा

    Pune Lohagad Trek Groom Ketan Agarwal Death : ​लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल याच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून केतन विशाल अग्रवाल या तरुणाचा लग्नाच्या तोंडावर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात केतनची नियोजित वधू, तिचा मित्र आणि अन्य साथीदारांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

    अपघात नव्हे घातपात!

    लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल याच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात मानला गेलेल्या या घटनेत आता घातपात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी लोहगडावर जोरदार वारे वाहत असल्याने सेल्फी घेताना तोल गेला आणि केतन खोल दरीत कोसळला, असा कांगावा त्याच्या नियोजित वधूने पोलिसांसमोर केला होता. मात्र सखोल पोलीस तपासात त्यांचं पितळ उघडं पडलं.

    वधूसह आठ जण कटात सहभागी

    तपासादरम्यान केतनची नियोजित वधू आणि तिच्या मित्रांनी मिळून त्याला दरीत ढकलण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या कटात एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचेही तपासातून स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.
    Maharashtra TimesCrime News : आधी बायकोशी वाद, मग 15 वर्षांपासून घरकाम करणाऱ्या महिलेचा डॉक्टरने जीव घेतला, पोलीस येताच तीनच शब्द म्हणाला
    या घडामोडीनंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी संबंधित आठ जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माहितीनुसार, पूर्वनियोजित कट रचून केतनला लोहगडावरील दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    या प्रकरणामुळे सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या मृत्यूकडे आता खुनाच्या संशयातून पाहिले जात असून, पोलिसांकडून संबंधित आरोपींची भूमिका, घटनास्थळी उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू आहे.

    एकनाथ शिंदेंनी विमान पाठवलं? गोकुळ गीते मुंबईत जाणार? विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

    उदयपूरमध्ये ठरलेला आलिशान विवाह

    केतनचा विवाह या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे होणार होता. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करुन कुटुंबीयांनी एक आलिशान महालही बुक केला होता; शिवाय उदयपूरला जाण्यासाठी दोन स्वतंत्र विमानांचेही बुकिंग करण्यात आले होते.
    Maharashtra TimesNagpur Crime : दार तोडताच भयंकर दृश्य, नागपुरात ४२ वर्षीय डॉक्टरचा वेदनादायी अंत, कौटुंबिक कलहाची दुर्दैवी अखेर झाल्याची चर्चा
    केतनचे वडील विशाल अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून त्याच्या पश्चात वडिलांसह आई, बहीण असा परिवार आहे. घटना घडल्याच्या दिवशी केतनच्या पार्थिवावर निगडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा