Beed FDA Action : अन्न व औषध प्रशासनाने राज्यात कारवाईचा धडाका सुरु केलाय. आता छत्रपती संभाजीनगरमधील पथकाने चक्क बीडमध्ये जाऊन मोठी कारवाई केली आहे. व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
बीड एफडीए बनावट तेलाचा साठा जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय पथकाने बीड जिल्ह्यात तेल रिपॅकिंग उद्योगांवर एक प्रचंड मोठी धडक कारवाई केली आहे. बीड एमआयडीसी, माजलगाव आणि वडवणी येथील नामांकित 5 तेल शुद्धीकरण आणि रिपॅकिंग उद्योगांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचे भेसळयुक्त व संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आलं आहे. या गंभीर गैरप्रकारानंतर संबंधित पाचही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करून ते उद्योग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
एफडीएच्या पथकाची धडक मोहीम
6 आणि 7 ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस एफडीएच्या पथकाने ही धडक मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान सुमारे 1 लाख 19 हजार 187 किलो संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारातील एकूण किंमत 1 कोटी 94 लाख 50 हजार 922 रुपये इतकी आहे. सहआयुक्त श्रीकांत करकळे व सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे 27 विविध नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
Tukaram Mundhe : शौचालयाच्या बाजूला अन्नाची साठवणूक, हॉटेल्समध्ये कीटकांचा वावर, स्वयंपाकघरात झुरळे; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची कारवाई
रिफाइंड अन् अल्ट्रा रिफाइंडचा बनाव
अन्न व औषध प्रशासनाच्या या शोधमोहिमेत कंपन्यांचा संतापजनक आणि धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. साठवणुकीच्या एकाच टाकीतील तेल वेगवेगळ्या नावांनी, तसेच रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड असा बनावट तेल विकले जात होते. तसेच जुने, गंजलेले आणि अत्यंत अस्वच्छ टिन (पत्राचे डबे) पुन्हा तेल भरण्यासाठी वापरले जात होते. कंपन्यांमध्ये कमालीची अस्वच्छता, साठवण टाक्यांची दुरावस्था, तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आणि कामगारांच्या मेडिकल प्रमाणपत्रांची अनुपस्थिती आढळून आली. त्यानंतर तेलाच्या गुणवत्तेची कोणतीही चाचणी न करताच हे तेल थेट बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांविरोधात आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Tukaram Mundhe : तलवारीने डास मारल्यासारखं करु नका, हायकोर्टाच्या FDA ला कानपिचक्या; आधी प्रशंसा केलेय, पण कायदेशीर प्रक्रियेचं काय?
अमरावती, नागपूरमध्येही छापे
अमरावतीतील ‘हॉटेल रोशनी’आणि ‘रोशनी स्वीट मार्ट’ तसेच नागपूरमधील ‘द हंग्री पांडा किचन’ यांच्याकडूनही स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा