Fake Call Center Busted In Bhiwandi: भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला असून, चालकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीतील अंजूरफाटा येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १९ जूनच्या रात्री छापा टाकण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये सुरू असलेले बोगस कॉल सेंटर उघडकीस आले. संबंधित ठिकाणी मागील चार महिन्यांपासून हे कॉल सेंटर सुरू होते. या केंद्राचा चालक हा एक तरुण असून त्याच्यासह आणखी एका व्यक्तीच्या मदतीने हा व्यवसाय चालवला जात होता. येथे काही युवक-युवती काम करत असून त्यापैकी पाच जण कॉलर, एक शिपाई आणि एक जण देखरेखीसाठी नेमलेला होता. पोलिसांनी सर्वांचे मोबाइल जप्त केले आहेत.
Pune Crime : होणाऱ्या बायकोनेच जीव घेतला! लोहगडावरुन दरीत पडून तरुणाच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; नियोजित वधू, मित्रासह 8 जणांवर गुन्हा
या कॉल सेंटरमार्फत कर्जाची गरज असलेल्या नागरिकांचे मोबाइल क्रमांक विविध सामाजिक माध्यमांतून मिळवले जात होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून संबंधित नागरिकांना फोन करून एका फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात होते. नागरिकांकडून कागदपत्रे मागवून ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली २,००० ते ५,००० रुपये उकळले जात होते. ही रक्कम कॉल सेंटरमधील कर्मचारी एटीएममधून काढून घेत असल्याचेही निष्पन्न झाले. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही कर्ज दिले जात नव्हते.
Satara News : नाशिकमध्ये भाजपकडून कुस्ती, साताऱ्यात मात्र शिवसेनेची दोस्ती, ZP तील गोंधळानंतरही युती निभावली
कागदपत्रांशिवाय सिमकार्ड खरेदी
फसवणुकीसाठी वापरली जाणारी सिमकार्डे आरोपी रस्त्यावरील विक्रेत्यांकडून कोणतीही कागदपत्रे न देता सुमारे १,२०० रुपयांना खरेदी करत होते. ही सिमकार्डे साधारण दहा दिवसांनी व्हेरिफिकेशन न झाल्याने बंद होत असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.
