Maharashtra MLC Election Result 2026 Gokul Gite : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीत विजयी झालेले गोकुळ गिते नेमके कोण आहेत?
नाशिक विधान परिषद निवडणूक गोकुळ गिते कोण आहेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : महायुतीकडे बहुमत असतानाही नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाची चव चाखावी लागली. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी ३५७ मते मिळवित दराडेंना धूळ चारली. त्यांना केवळ २४८ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे दराडेंसाठी महायुतीचे मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे नाशिकमध्ये तळ ठोकून असतानाही गितेंनी विजयश्री खेचून आणत ते जायंट किलर ठरले.
गोकुळ गिते यांची सुरुवातीपासूनच आघाडी
गुरुवारी (दि. १८) झालेल्या मतदानात ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात ९९.८४ टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली. त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मोजणीदरम्यान ६१८ पैकी १३ मते अवैध, तर ६०५ मते वैध ठरविण्यात आली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. चार टेबलांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. Gokul Gite : भाजप-राष्ट्रवादीचा डाव शिवसेनेने उलटवला; दराडे हरले तरी शिंदेच जिंकले, सामंतांना चार्टर प्लेनने पाठवत गितेंना ‘गोकुळा’त घेतलं अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. विजयासाठी ३०३ मतांची आवश्यकता असताना गिते यांनी तब्बल ३५७ मते मिळवली. शिवसेना शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मते मिळवता आली. गिते यांनी दराडेंचा १०९ मतांनी पराभव केला. आणखी एक अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली. गिते यांनी पहिल्याच फेरीत ३०३ चा कोटा पार केला. त्यामुळे दुसरी फेरी घेण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. शंभरकर यांच्या उपस्थितीत प्रसाद यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्य गिते यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कोण आहेत गोकुळ गिते?
गोकुळ गिते हे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचे बंधू आहेत. गिते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गिते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे. गत विधानसभा निवडणुकीत गणेश गिते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार होते. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन गोकुळ गिते यांनी सांभाळले होते. Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्यासाठी तीन कोटी मंजूर, पुण्यातील 22 ग्रामपंचायतींना निधी वितरित; ग्रामपंचायतींची जबाबदारी काय?
‘मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला’
‘या निवडणुकीत मी प्रचार थांबवला होता. परंतु, कुणालाही पाठिंबा दिला नव्हता. निवडणूक काळात मी घरात बसून होतो. परंतु, कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली. शिवसेनेच्या उमेदवाराविषयी नाराजी होती. त्यामुळे मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांचा विश्वास सार्थ ठरवू’, अशी विजयी उमेदवार गोकुळ गिते यांनी प्रतिक्रिया दिली.
एकूण मतदान – ६१८
अवैध मते – १३
वैध मते – ६०५
विजयासाठी आवश्यक मते – ३०३
गिते यांना मिळालेली मते – ३५७
दराडे यांना मिळालेली मते – २४८
एकनाथ शिंदेंनी विमान पाठवलं? गोकुळ गीते मुंबईत जाणार? विजयानंतर पहिली प्रतिक्रिया
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा