Ashadhi Ekadashi 2026 Fund of Three Crores : यंदाच्या पुण्यातील आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला तीन कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींना सुपूर्द करण्यात आला आहे.
आषाढी एकादशी २०२६ तीन कोटी निधी मंजूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालखी मुक्काम स्थळी वारकऱ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी तीन कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेकडून मोठी मागणी होती
आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून श्री संत सोपान महाराज, श्री संत गोरा कुंभार महाराज, श्री संत निळोबाराय महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालखी मुक्काम स्थळी पालखी तळावरील जमिनीचे सपाटीकरण करणे, स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करणे, वीज व पाणी पुरवठा करणे, पालखी स्वागत व निरोप कक्ष उभारणे, वाहन व इंधनाची व्यवस्था करणे यासारख्या कामांसाठी अनुदान व इतर खर्चासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती. Weather Update: मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुण्यानंतर ४८ तासांत संपूर्ण राज्यात मान्सून धडकणार; कुठे ‘यलो’? कुठे ‘ऑरेंज अलर्ट’? त्यानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची ना हरकत घेऊन पुणे जिल्हा परिषदेला निधी देण्यास ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पुणे जिल्ह्यात विविध संतांच्या पालख्यांचे ३४ ठिकाणी मुक्काम होणार आहेत; तर ५८ ठिकाणी विसावा आणि नऊ ठिकाणी निवाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार पालख्यांच्या सोयीसुविधांच्या नियोजनाची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींसह प्रशासनाची असेल.
पहिल्या टप्प्यात १० टक्के निधी
ग्रामपंचायतींना अनुदान व इतर खर्चासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत’ पुणे जिल्हा परिषदेला तीन कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी तीन कोटी ३३ लाख रुपयांचा निधी प्रत्यक्ष ग्रामपंचायतींना मंजूर करण्यात आला आहे. ‘पहिल्या टप्प्यात एकूण निधीच्या १० टक्के म्हणजे ३८ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचयातींना वितरित करण्यात आला आहे. सुमारे २२ ग्रामपंचायतींना हा निधी वितरित करण्यात आला आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. Nagpur Crime : दार तोडताच भयंकर दृश्य, नागपुरात ४२ वर्षीय डॉक्टरचा वेदनादायी अंत, कौटुंबिक कलहाची दुर्दैवी अखेर झाल्याची चर्चा
तीन कोटी ३३ लाखांचा निधी उपलब्ध
‘पुणे जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचा विविध ठिकाणी मुक्काम असतो. दिंड्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने अनुदान दिले आहे. ग्रामपंचायतींसाठी तीन कोटी ३३ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा