• Fri. Jun 26th, 2026

    नामांकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 22, 2026
    नामांकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. २२ : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी ६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मुंबई यांनी केले आहे.

    अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. या योजनेसाठी २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ६ जुलै २०२६ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, मुंबई या कार्यालयास अर्ज करणे आवश्यक असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed