• Thu. Jun 18th, 2026

    Raigad Crime: प्रेयसीसोबत वाद होताच आधी तिला संपवलं, नंतर स्वत:ही मृत्यूला कवटाळलं; प्रेमसंबंधातून दुहेरी मृत्यूने खळबळ

    Raigad Crime: प्रेयसीसोबत वाद होताच आधी तिला संपवलं, नंतर स्वत:ही मृत्यूला कवटाळलं; प्रेमसंबंधातून दुहेरी मृत्यूने खळबळ

    अमुलकुमार जैन, रायगड: जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी गणेश ताडकर (वय २०, रा. निडी, ता. रोहा) आणि रोहित जनार्दन पाटील (वय २७, रा. निडी) हे दोघे सोमवारी रात्री निडी येथील लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांच्या घरात होते. रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या रोहित पाटील याने तन्वीला मारहाण करून नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने त्याच घरातील हॉलमध्ये पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. संबंधित घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य ठाणे येथे वास्तव्यास आहेत. घराची देखभाल तन्वीच्या आईकडे असल्याने घराची चावी त्यांच्याकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

    घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

    दरम्यान, या प्रकरणी नामदेव मनोहर मढवी यांच्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed