• Tue. Jun 16th, 2026

    पुण्याहून शिर्डीला जाणं सोपं होणार! पहिल्यांदाच सुरू होणार थेट रेल्वेसेवा; ‘इंटरसिटी’प्रमाणे ट्रेन

    पुण्याहून शिर्डीला जाणं सोपं होणार! पहिल्यांदाच सुरू होणार थेट रेल्वेसेवा; ‘इंटरसिटी’प्रमाणे ट्रेन

    Pune Railway News: पुण्याहून शिर्डीपर्यंत थेट इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात होती. आता पुणेकरांना अखेर दिलासा मिळणार असून बुधवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दोन रेल्वेसेवांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यातून सुटणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये उद्या, बुधवारी (१७ जून) उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये पुणे ते शिर्डीदरम्यान ‘इंटरसिटी’प्रमाणे रेल्वेसेवा सुरू होणार आहे. याशिवाय हडपसर ते दानापूरदरम्यान नवीन ‘अमृत भारत सेवा’ होणार आहे. पुणे-शिर्डी रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    वेळापत्रक कधी जाहीर होणार?

    पुणे-शिर्डीदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे; पण थेट रेल्वेसेवा नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे पुणे-शिर्डी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. त्यानुसार आता रेल्वे प्रशासनाने ही रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वेमंत्री वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. अद्याप या रेल्वेगाडीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. येत्या दोन दिवसांत या गाडीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Infra Update: दादर, पनवेल, CSMTनंतर बनतयं नवं Jogeshwari Terminus, प्रकल्पाच्या कामाला वेग, मेट्रो-लोकलला थेट जोडणी

    हडपसर येथून दानापूरसाठी अमृतभारत रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. त्याचेदेखील सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन केले जाणार आहे. या वेळीही मुख्यमंत्री व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. या गाडीचे वेळापत्रक लवकर जाहीर केले जाणार आहे. पुण्यातून दिल्लीसाठी अमृतभारत सुरू करण्याची मागणी आहे; पण दानापूरसाठी गाडी सुरू केल्यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी आहे. पुणे-दानापूर अमृत भारत एक्स्प्रेसची देखभाल दुरुस्ती दानापूर येथेच केली जाणार आहे. त्या विभागाने ही गाडी सुरू केली आहे. पुण्यातून राज्याअंतर्गत गाड्या सुरू करण्याची मागणी असताना उत्तर भारतासाठी गाड्या सुरू केल्या जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे.

    धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार

    शिर्डी हे पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. पुण्यापासून मिळणाऱ्या या नवीन थेट रेल्वे सुविधेमुळे भाविकांची मोठी सोय होणार असून, या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. पुणे ते शिर्डीदरम्यानची ही पहिली थेट रेल्वे सेवा असून, या सेवेमुळे अहिल्यानगर आणि शिर्डी येथील रहिवाशांना पुण्यातील शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. या रेल्वेमुळे या भागातील दळणवळण सुधारण्यास, पर्यटन व व्यापारास चालना मिळण्यास आणि प्रवाशांची सोय होण्यास मदत होईल.

    Maharashtra TimesTejas Express: प्रीमियम दर भरूनही निकृष्ट सेवा, ‘तेजस एक्सप्रेस’च्या प्रतिष्ठेसह सेवादर्जात घसरण; गाडीला नेहमी 7-8 तास विलंब

    “पुणे-शिर्डी व हडपसर-दानापूर अमृत भारत या दोन रेल्वेगाड्या नव्याने सुरू होत आहेत. त्याचे उ‌द्घाटन रेल्वेमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. पुणे-शिर्डी ही रेल्वे दररोज पावणार आहे,” अशी माहिती मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा