Pune Cyber Fraud Racket: मुंढवा पोलिसांनी केलेल्या कारवाईमागे जवळपास १५ दिवसांचा गुप्त तपास असल्याची माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के (वय ४०, रा. फुरसुंगी) यांचा समावेश आहे. तपासात प्रमुख सूत्रधार अमित मजेटिया हा दुबईत असल्याचे, तर भागीरथ पांड्या आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचे समोर आले असून, त्यांचा शोध सुरू आहे. याशिवाय कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या निदा अन्सारी, पूनम भालके, अनुजा जाधव, रवींद्र कुरळे, अक्षय पाटील, विवेक जाधव, प्रांजल मिश्रा आणि सागर उसरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News : ‘नोकरी सोडून द्या, अन्यथा…’; ऑफिसमधल्या छळाला कंटाळून पुण्यातील IT अभियंत्याचं टोकाचं पाऊल, मृत्यूला कौटुंबिक वादाचीही किनार, नोटमध्ये काय आढळलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनोरा चेंबर्स, अमनोरा मॉल; तसेच फुरसुंगी परिसरातील कार्यालयांमधून नागरिकांना फोन करून ऑनलाइन गेमिंगमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले जात होते. सुरुवातीला काही गेममध्ये जिंकू देऊन विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर मोठ्या रकमांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली जात होती. पैसे गमावल्यानंतर ते परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुन्हा रक्कम उकळण्याचाही प्रकार सुरू होता.
सतरा लाख खातेदारांच्या डेटाचे घबाड !
तपासात कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांची आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन त्यात फेरफार करून सिम कार्ड व बनावट बँक खाती उघडण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे; तसेच पाच अल्पवयीन मुला-मुलींना कामावर ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे करून घेतल्याचाही आरोप आहे.
Pune News: फडणवीस-शिंदेंच्या वादात पुण्यातील महत्त्वाचा विषय रखडला; PMRDA ची होरपळ
दररोज तीनशे-चारशे जणांची फसवणूक
पोलिस हवालदार शिवाजी जाधव आणि पोलिस अंमलदार योगेश राऊत यांना काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या प्रकाराचा सखोल अभ्यास करून पुरावे गोळा केले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली. तपासादरम्यान या रॅकेटच्या माध्यमातून पुण्यासह देशभरातील नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे स्पष्ट झाले. दररोज तीनशे ते चारशे नागरिकांची या माध्यमातून फसवणूक होत होती, अशी माहिती समोर आली आहे.
