Kalyan Station Expired Ticket: कल्याण रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकीटाची वैधता संपल्यामुळे त्याचाकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे: कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता संपल्यामुळे त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ट्रेन विलंबाने धावत असल्यामुळे हा व्यक्ती स्थानकावर अधिक काळ थांबला होता. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
नेमकं काय घडलं?
11 जून रोजी कल्याण जंक्शनवर एक व्यक्ती आपल्या नातेवाईकांना लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आला होता. ही ट्रेन दुपारी 12 वाजता कल्याण स्थानकावर दाखल होणार होती. पण काही कारणांमुळे ट्रेनला 5 तास उशीर झाला. त्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवाशांची रखडपट्टी झाली. नातेवाईकांना सोडण्यासाठी या व्यक्तीने प्लॅटफॉर्म तिकीट काढलं होतं. पण हे तिकीट केवळ 2 तासांसाठी वैध असतं. त्यामुळे टीसीने या व्यक्तीला 500 रुपयांचा दंड ठोठावला.
Kalwa-Airoli Rail Corridor: कल्याणवरून थेट नवी मुंबईपर्यंत प्रवास शक्य, ‘कळवा ते ऐरोली रेल लाइन’चा मार्ग मोकळा; मध्य रेल्वेकडून काम सुरू
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, प्लॅटफॉर्म तिकिटाचा गाडीच्या आगमनाच्या आणि निर्गमनाच्या वेळीशी काहीही संबंध नसतो. हे केवळ एका ठराविक कालावधीसाठीच वैध असतं. रेल्वे कर्मचाऱ्याने या नियमाचं पालन करून त्याच्याकडून दंड आकारला. पण ट्रेनला विलंब झाला यामध्ये प्रवाशांची किंवा नागरिकांची काय चुक, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ट्रेनचं वेळापत्रक हे प्रवाशांच्या नियंत्रणाबाहेर असतं. त्यामुळे अशा वेळी दंड आकारणे म्हणजे प्रवाशांवर अन्यायच आहे त्या नागरिकाची प्रतिक्रिया होती.
व्हिडिओ व्हायरल
या घटनेनंतर स्थानकावरच व्हिडिओ करून या व्यक्तीने तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष वेधलं गेलं. या प्रवाशाची क्लिप तुफान व्हायरल झाली असून हजारो नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. काही प्रवाशांनी कमेंटमध्ये त्यांनाही काही स्थानकांवर असाच अनुभव आला असल्याचं सांगितलं. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यामुळेच आधीच प्रवासात विलंब होतो. आता त्यांच्याकडून अतिरिक्त पैसेही उकळले जात आहेत असा आरोप केला जात आहे.
जर तुमची ट्रेन दिलेल्या वेळेच्या तीन तासांनंतरही स्थानकावर आली नसेल तर प्रवाशांना रिफंड देण्याची सुविधा उपलब्ध आहे. ट्रेन स्थानकावरून रवाना होण्याच्या एक तासापूर्वीपर्यंत हे रिफंड घेतलं जाऊ शकतं. तिकीट काउंटरवर जाऊन TDR फॉर्म भरावा लागतो. परंतु, ही सुविधा फक्त ट्रेन तिकीटांसाठी उपलब्ध आहे. प्लॅटफॉर्म तिकीटासाठी अशी कोणतीही रिफंड सुविधा नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा