Live Marathi News: ‘आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे घडले ते मी समजून, सावरून घेतले, पण यापुढे असे होऊ देणार नाही. पक्षातील अनुभवी नेते आणि तरुण नेत्यांची ऊर्जा ही यशाची गुरुकिल्ली आहे, पण कुणी पक्षात किती वर्षे काढली, यापेक्षा पक्षासाठी किती काम केले, याचा पदे देताना विचार केला जाईल,’ अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या २७व्या वर्धानपदिनी, गुरुवारी मांडली. तसेच ‘पक्षात अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही,’ असा इशाराही दिला. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवस गोवा आणि तळकोकण येथे पाऊस पडल्यानंतर कोकण किनारपट्टीवरून पाऊस गायब झाला आहे. सध्या वारेही वायव्येकडून असून, यामुळे तापमानाचा ताप अधिकच जाणवत आहे. मुंबईमध्ये गुरुवारी कुलाबा येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या १० वर्षांमधील हे जूनमधील सर्वाधिक कमाल तापमान आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
