• Sun. Jun 14th, 2026
    ST Employees : प्रवाशांसाठी अहोरात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता दिला जाणार, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचं आणि एसटीचं अनोखं असं नातं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची वाहतूक आणि दळवळण सुविधा आजही एसटीवर अवलंबून आहे. गाव आणि तालुक्याला जोडण्यात एसटीचा अतिशय मौल्यवान असा वाटा राहिलेला आहे. हा वाटा आजही तसाच आहे. आजही लाखो नागरिक एसटीने प्रवास करतात. एसटी ही आजही अनेक तालुक्यांची लाईफलाईन आहे. ग्रामीण भागाची जनता आजही एसटीने दररोज प्रवास करते. तसेच शहरात देखील परिवहन विभागाच्या शहरी बसेस तितक्याच महत्त्वाच्या भूमिका बजावतात. एसटी महामंडळात लाखो प्रवाशांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं योगदान देखील मोठं आहे. या कर्मचाऱ्यांना खूश करणारा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे.

    प्रताप सरनाईक यांची घोषणा काय?

    एसटी कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. “राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना 53 टक्क्यांवरुन 58 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांची जवळपास 100 कोटींची थकबाकी होती. ती सुद्धा देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी या संदर्भात चर्चा केली. या चर्चेत त्यांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला”, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

    “मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. एसटी महामंडळाची जी काही थकबाकी आहे, आमच्यावर जो काही आजपर्यंतचा बोझा आहे तो कमी करण्यासाठी वित्त विभागाने सहकार्य करावं”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

    प्रताप सरनाईक काय-काय म्हणाले?

    “अडचणींवर मात करुन पुढे जायचं असतं. सध्याच्या परिस्थितीत काहीही अडचणी येणार नाहीत. आम्ही उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत आहोत. सकाळी साडेदहा वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत आम्ही उत्पन्न वाढीवरच चर्चा केली. उत्पन्न वाढीसाठी जे लॉसमध्ये असलेले रुट आहेत ते बंद करावेत, तिथे कमी बसेस करावेत. नुकसानीचं रुपांतर ना नफा आणि ना तोटा यात कसं होईल? याबाबत खबरदारी घेणं आवश्यक आहे. पर्यटनासाठी बसेस उपलब्ध करुन देणं जेणेकरुन उत्पन्नात वाढ होईल”, अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली.

    “मी पहिल्या टप्प्यात 2640 एसटी पहिल्या टप्प्यात दिलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात 3 हजार बसेस पैकी 150 बसचे वितरण झाले आहे. लवकरच 800 ते 900 बस येणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात या एसटी पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. या गाड्यांचे वितरण दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. प्रत्येक आगारासाठी किती बस द्यायच्या याची सूचीसुद्धा केलेली आहे. ते वितरण संपलं की, 5000 बसेसचे विचरण करणार आहोत. यामुळे बाहेरच्या गाड्यांची आवश्यकता लागणार नाही. 2027 नंतर आम्ही पूर्ण ईव्ही वेहिकल घेणार आहोत. भविष्यात प्रवाशांना आहे त्या तिकीटात एसी गाड्यांची सुविधा मिळावी, अशा सूचना देखील मी दिलेल्या आहेत”, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा