Pune Congress Arvind Shinde: महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात उभे राहणाऱ्यांना मदत करण्याचे राजकारण सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली; पण त्यांच्या निष्ठेची किंमत शून्य करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी पक्षातील निर्णय प्रक्रियेवर जोरदार हल्लाबोल केला. ‘स्थानिक कार्यकर्त्यांनी आदेश मानून उमेदवारीला पाठिंबा दिला. मात्र, माघारीचा निर्णय घेताना त्यांना साधे विश्वासातही घेतले गेले नाही. पुण्यात काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण सुरू आहे.
Pune Firing : पुण्यात रात्री 10 वाजता बिकानेर चौकात गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या चौघांकडून हल्ला
सतेज पाटीलही अंधारात?
या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसचे पुणे प्रभारी सतेज पाटील यांनाही विश्वासात घेतले नसल्याचा दावा शिंदे यांनी केला. ‘प्रदेश नेतृत्वाच्या नावाने निर्णय होत होते. मात्र, स्थानिक पातळीवर कोणताही खुलासा झाला नाही,’ असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराकडून उमेदवारी माघारीचे समर्थन करताना वरिष्ठ पातळीवरून ‘घोडेबाजार’ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असा दावा केला होता. त्यावर शिंदे म्हणाले, ‘प्रत्यक्ष निवडणूकच झाली नाही, तेव्हा घोडेबाजार झाला कुठे? आणि झाला असेल, तर त्याची माहिती कोणाकडे आहे?’ या संपूर्ण प्रकरणातील पडद्यामागील घडामोडींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
CJP Pune Protest: पुण्यातील ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनाला विद्यापीठाची परवानगी! शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने होणार
काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर
विधान परिषद निवडणुकीतील या वादामुळे काँग्रेसमधील नाराजी उघडपणे समोर आली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यानेच प्रदेश नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘गेली अनेक दशके पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधीच नाकारली जात असेल, तर असंतोष निर्माण होणारच. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी शिंदे यांनी केली.
