राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचा २७वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. ‘राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाची जाहिरात वृत्तपत्रांत पहिल्या पानावर झळकली आहे. पहिल्या पानावरील जाहिरातींची किंमत किती असते, हे सर्वांना माहित आहे. म्हणूनच आपण कधी त्या रस्त्याने गेलो नाही. मात्र, आजच्या कार्यक्रमाला असलेली मोठी उपस्थिती पाहिली तर ही जाहिरात आपल्या सर्वांसाठी आहे, याचे आपण स्वागत केले पाहिजे’, या शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.
Ritu Tawde: ना झुकणार, ना थांबणार! बॉम्बच्या धमकीनंतरही महापौर रितू तावडे ‘ऑन ड्युटी’; म्हणाल्या, ‘मुंबईच्या सुरक्षेसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार’
‘देशात अनेक समस्या आहेत. बेरोजगारी, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक या घटकांच्या समस्या वाढत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या प्रश्नांविषयी किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे. काही लोक सातत्याने देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता झालाच नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी कमकुवत झालेली नसून निष्ठावंत कार्यकर्ता शरद पवार यांच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद पडत असल्याचे सांगितले. परंतु, ही गोष्ट बंद पडू देणार नाही, १४ जूननंतर वेगळ्या माध्यमात ती सुरूच राहील, याची ग्वाही दिली. त्यास प्रतिसाद देत आमदार रोहित पवार यांनी त्यांना ५० लाख रुपयांची तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर केली.
Rupali Chakankar: ‘अशोक खरात प्रकरणात माझ्यावरचे आरोप वेदनादायक’; बदनामी करणाऱ्यांना रुपाली चाकणकरांच्या धडाधड नोटीसा, थेट दिल्ली कोर्टापर्यंत खेचलं
गांधी कुटुंबाचे बलिदान
‘पंतप्रधान होण्याआधी नेहरूंनी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचे काम केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ संघर्ष केला. अनेक वर्षे तुरुंगवास सोसला, हा इतिहासाचा भाग कोणीही विसरू शकत नाही’, असेही पवार म्हणाले. नेहरुंनंतर इंदिरा गांधींनी देशासाठी अहोरात्र काम केले, पाकिस्तानला धडा शिकवला. इंदिरा आणि राजीव गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःच्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. या कुटुंबाचा त्याग कोणीही विसरू शकत नाही, याची आठवण पवार यांनी करून दिली.
