• Thu. Jun 11th, 2026

    Thane News: ठाण्यात बर्थडेसाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या तारा! ३ वर्षीय रियांशने केकसह दोन मेटल पिनही गिळल्या, ४८ तास कुटुंब गॅसवर!

    Thane News: ठाण्यात बर्थडेसाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या तारा! ३ वर्षीय रियांशने केकसह दोन मेटल पिनही गिळल्या, ४८ तास कुटुंब गॅसवर!

    ठाणे: लहान मुलांच्या वाढदिवसाला पालक नवनवीन प्रयोग करत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र असा प्रयत्न ठाण्यातील एका कुटुंबासाठी धक्का देणारा ठरल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील ३ वर्षीय रियांशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांनी स्पायडरमॅन थिम केक ऑर्डर केला होता. रात्री उशिरा केक कापून रियांशचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रियांशने केकच्या वरच्या भागात असणारे चॉकलेट खाल्ले. मात्र या चॉकलेटला आधार देण्यासाठी बेकरी चालकाने त्यामध्ये मेटल पिनचा वापर केला होता. मात्र चिमुकल्या रियांशच्या ही बाब लक्षात आली नाही आणि त्याने चॉकलेटसह दोन मेटल पिनदेखील गिळल्या. धक्कादायक बाब म्हणजे बेकरी चालकाकडून कुटुंबीयांना याबाबतची कोणतीच माहिती देण्यात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी ठाण्यातील हिरानंदाणी इस्टेट इथं राहणाऱ्या बायोलॉजी शिक्षिका स्नेहा शेलार यांचा मुलगा रियांश याचा वाढदिवस होता. सायंकाळी त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आणि आनंदाच्या वातावरणात केक कापण्यात आला. मात्र काही वेळानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. केकच्या वरील भागात चॉकलेट बॉल्सला आधार देण्यासाठी आतमध्ये मेटल पिनचा वापर करण्यात आला असल्याचं घरातील मोठ्या मुलांच्या लक्षात आलं. रियांशनेही हे चॉकलेट खाल्ले असल्याने या मेटल पिन त्याने गिळल्याचा संशय कुटुंबीयांना आला. त्यामुळे रियांशला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली.

    ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर ऑपरेशन न करता मेटल पिन रियांशच्या पोटातून नैसर्गिकरीत्या बाहेर पडण्याची वाट पाहावी, असा सल्ला कुटुंबीयांना दिला. ४८ तासांनी या पिन रियांशच्या पोटातून नैसर्गिकरीत्या बाहेर पडल्याने शेलार कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

    आईचे बेकरी चालकावर गंभीर आरोप

    रियांशच्या आई स्नेहा शेलार यांनी या घटनेनंतर सोशल मीडिया पोस्टमधून संताप व्यक्त करत बेकरी चालकावर गंभीर आरोप केले आहेत. शेलार म्हणाल्या की, “माझ्या मुलाचा यंदाचा वाढदिवस आमच्यासाठी एक वाईट स्वप्न ठरला. वाढदिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही सजावट केली होती. तसंच केक आणण्यात आला आणि कुटुंबासह नातलगांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. लहान मुलासाठी केक बनवायचा आहे, असं सांगितलेलं असतानाही बेकरी चालकाने कोणतीही पूर्वकल्पना न देता या केकमध्ये मेटल पिन्सचा वापर केला,” असा आरोप शेलार यांनी केला आहे.

    स्नेहा शेलार यांनी पुढे म्हटलं आहे की, “रियांशच्या पोटात गेलेल्या दोन्ही मेटल पिन बाहेर पडल्याने त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र ते ४८ तास आमच्यासाठी अत्यंत भीतीदायक होते.”

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed